Current Affairs | चालू घडामोडी | 19 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 19 APR 2024

1) आर्यभट्ट चे प्रक्षेपण = 19 एप्रिल 1975

 • भारताचे पहिले सॅटॅलाइट
 • स्थळ = Kapustin Yar (USSR)

2) व्हाईस ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांची पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते 30 एप्रिल 2024 रोजी दुपारी विद्यमान ॲडमिरल आर हरी कुमार यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील.

3) अंतराळ क्षेत्रात 100% पर्यंत FDI ला परवानगी देण्यासाठी सरकारने FEMA (Foreign Exchange Management Act) मध्ये नियम अधिसूचित केले

 • अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उपग्रह, उपग्रह डेटा उत्पादने, ग्राउंड सेगमेंट आणि वापरकर्ता विभाग यांच्या निर्मिती आणि ऑपरेशनसाठी 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे, त्यापैकी 74 टक्के पर्यंत स्वयंचलित मार्गाने (Automatic) होईल आणि 74 टक्क्यांहून अधिक गुंतवणुकीसाठी सरकारची परवानगी आवश्यक असेल

4) ‘आयटीसीएम’ची यशस्वी उड्डाण चाचणी

 • भारताने स्वदेशी तंत्रज्ञान क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम) ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यानजीकच्या चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवर यशस्वी उड्डाण चाचणी केल्याचे संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) सांगितले
 • स्वदेशी प्रणोदनाद्वारे (प्रोपल्शन) संचालित लांब पल्ल्याच्या स्वदेशी सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा यशस्वी विकास हा भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या संशोधन आणि विकासातील महत्त्वाचा टप्पा आहे

5) माळढोक संवर्धन प्रजनन केंद्रात आणखी एका पिल्लाचा जन्म

 • या हंगामात आतापर्यंत तीन पिल्लांचा जन्म झाला. त्यामुळे माळढोक संवर्धन प्रयत्नांच्या दिशेने आणखी एक सकारात्मक पाऊल पडले
 • माळढोक भारतात १५० च्या संख्येत शिल्लक आहेत. या १५० पक्ष्यांपैकी सुमारे ९० पक्षी केवळ दोन संरक्षित क्षेत्रात आढळतात.
 • केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने या पक्ष्याच्या संवर्धनासाठी पाऊल उचलत राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यातील सॅम व रामदेवरा येथे संवर्धन प्रजनन केंद्र उभारले.
 • निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आययूसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत ‘नामशेष’ या वर्गवारीत माळढोक आहे

6) लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन

 • टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प
 • सध्या या मोटारींचे तीन उत्पादन प्रकल्प ब्रिटनमध्ये असून, चीन, ब्राझील आणि स्लोव्हाकियामध्येही प्रकल्प आहेत.
 • टाटा मोटर्सने २००८ मध्ये ही कंपनी ताब्यात घेतली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment