Current Affairs | चालू घडामोडी | 20 APR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 20 APR 2024

1) 25 वी घटना दुरुस्ती = 20 एप्रिल 1971

  • मालमत्तेचा हक्क मर्यादित करण्यात आला
  • कलम 31 सी समावेश

2) क्वांटम तंत्रज्ञानातील देशातील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतर्फे (आयसर, पुणे) येथे सुरू करण्यात येणार आहे.

  • आयसर ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील स्वायत्त शिक्षण आणि संशोधन संस्था आहे. 2006 मध्ये स्थापना.

3) भारताला गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत चार पदके

  • दोन रौप्य, दोन कांस्य पदकांची कमाई
  • जॉर्जियातील स्काल्तुबो येथे 13 व्या युरोपियन मुलींच्या गणितीय ऑलिम्पियाडचे (EGMO 2024) आयोजन करण्यात आले होते
  • भारतीय संघातील हरियाणाच्या गुंजन अग्रवाल आणि केरळच्या संजना चाको या विद्यार्थिनींनी रौप्य पदके पटकावली.
  • हरियाणाच्या लरिसा गोयल आणि महाराष्ट्रामधील पुण्यातील सई पाटील या विद्यार्थिनींनी कांस्य पदक पटकावले.

4) ज्येष्ठ बालसाहित्यकार दत्ता टोळ यांचे निधन

  • अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे ते विश्वस्त होते.
  • ‘वादळवाटेवरील सोबती’ हे टोळ यांचे आत्मचरित्र अलीकडेच प्रकाशित झाले आहे.
  • टोळ हे नगर येथे २००० मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

5) “नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार” – सर्वोच्च न्यायालय

  • सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच हवामान बदलामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांबद्दल एक महत्त्वाचा निर्णय दिला.
  • या निर्णयात सर्वोच्च न्यायालयानं हे जाहीर केलं, की हवामान बदलामुळे जे प्रतिकूल परिणाम होतात, त्यापासून मुक्त होण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.
  • सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय देताना राज्यघटनेतील कलम १४ आणि २१ यांचा सविस्तर, व्यापक विचार केला आहे.
  • कलम १४ हे समान अधिकारांशी संबंधित आहे आणि कलम २१ हे जगण्याच्या मूलभूत अधिकारासंबंधित आहे.
  • स्वच्छ हवामान हा जगण्याच्या मूलभूत अधिकाराचाच भाग आहे आणि नागरिकांना स्वच्छ हवामान मिळावं, यासाठी शासकीय यंत्रणेनं नागरिकांच्या सहभागातून ठोस प्रयत्न केले पाहिजेत, याबद्दल या निर्णयात विचारविमर्श केला आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment