Current Affairs | चालू घडामोडी | 19 JUN 2024
1) 19 जून
1.1) शिवसेना पक्षाची स्थापना = 19 जून 1966
- संस्थापक = बाळासाहेब ठाकरे
1.2) ॲपल उपग्रहाचे प्रक्षेपण = 19 जून 1981
- भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह
2) जागतिक स्तरावर नावाजलेले चित्रपट निर्माते विनोद गणात्रा यांना चित्रपटातील योगदानाबद्दल ‘नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
- हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत
3) आता पांढरे रेशन कार्ड धारक यांना सुद्धा महात्मा फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार
- यामुळे राज्यातील प्रत्येकालाचा आता 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार
- योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे.
- या निर्णयामुळे सर्वसामान्य, गरीब आणि आता मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
4) 4 ओव्हर्स, 3 विकेट्स पण एकही धाव दिली नाही, न्यूझीलंडच्या लोकी फर्गुसनचा वर्ल्ड रेकॉर्ड
- पुरुषांच्या T20 WC मध्ये सर्वात किफायतशीर 4-ओव्हर स्पेल
5) थायलंडमध्ये समलैंगिक विवाहांना मंजुरी
- थायलंडच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये 18 जून 2024 रोजी समलैंगिक विवाहांना मान्यता देणारे विधेयक संसदेत मंजूर झाले आहे.
- हे विधेयक मंजूर झाल्यामुळे आता समलैंगिक विवाहांना मान्यता देणारा थायलंड हा आग्नेय आशिया खंडातील पहिला आणि आशिया खंडातला तैवान आणि नेपाळनंतरचा तिसरा देश ठरला आहे.
6) निर्मला सीतारामन यांचा विक्रम स्थापित होणार
- पुढच्या महिन्यात सादर करणार सातवा अर्थसंकल्प..
- अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत लागोपाठ 5 वेळा देशाचा अर्थसंकल्प तर एकदा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे.
- मोरारजी देसाई यांनी लागोपाठ सहा वेळा देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता.
- एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम अद्यापही मोरारजी यांच्याच नावावर आहे.
- सीतारामन यांची वैशिष्ट्ये :-
- इंदिरा गांधींनंतर अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला नेत्या
- इंदिरा गांधींनंतर संरक्षण मंत्रिपद सांभाळणाऱ्या दुसऱ्या महिला
- 1984 मध्ये जेएनयूमधून अर्थशास्त्र विषयात मास्टर्स डीग्री
- 2003 ते 2005 राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या
- 2004 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
- निर्मला सीतारामन या भारताच्या पहिल्या महीला पूर्णवेळ अर्थमंत्री ठरल्या आहेत.
7) कवच प्रणाली
- रेल्वेगाड्यांची टक्कर टाळण्यासाठी ‘कवच’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे
- ही एक स्वयंचलित (एटीपी) प्रणाली आहे. चालकाने वेळेवर ‘ब्रेक’ लावला नाही तर गाडीचा वेग नियंत्रित करणे हे या प्रणालीचे काम आहे.
- कवचद्वारे चालकांना रेल्वे मार्गावरील धोक्याचे सिग्नल ओळखण्यात मदत मिळते. कमी दृश्यमानतेच्या ठिकाणी गाडी चालवण्यासही मदत होते
- कवच प्रणाली ज्या मार्गावर कार्यान्वित केली जाते, त्या मार्गावरील गाडी सुरक्षितपणे जाऊ देण्यासाठी ५ किलोमीटरच्या आत असलेल्या सर्व गाड्या थांबवल्या जातात. रेल्वे इंजिनमध्ये असलेल्या डिजिटल बोर्डवरील सूचनांचा वापर करून चालक अधिक अचूकतेने धोक्याचे सिग्नल वाचू शकतो
- परंतु महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेला मध्य रेल्वे विभाग अद्याप या प्रणालीपासून लांबच आहे. मध्य रेल्वेचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ, सोलापूर असे विभाग आहेत. परंतु अद्याप त्यांना ‘कवच’चे संरक्षण लाभलेले नाही.
8) भारतीय लष्कराची ‘त्वचा बँक’ सुविधा
- उद्देश = जवान आणि त्यांच्या कुटुंबियांमधील गंभीर भाजलेल्यांवर उपचार आणि त्वचेशी संबंधित इतर आजारांवर उपचार करणे
- त्वचा बँकेत प्लास्टिक सर्जन, टिश्यू इंजिनीअर आणि विशेष तंत्रज्ञांसह उच्च-प्रशिक्षित वैद्यकीय पथक तैनात असणार आहे.
- सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय सेवांमध्ये स्थापन करण्यात आलेली ही पहिलीच सुविधा आहे.
- ही बँक त्वचांचे संकलन, प्रक्रिया, साठवण आणि वितरण यासाठी केंद्रीकृत केंद्र म्हणून काम करेल
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel