Current Affairs | चालू घडामोडी | 20 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 20 NOV 2023

1) ऑस्ट्रेलियाने भारताला नमवून क्रिकेट चे विश्वविजेतेपद पटकावले.

  • आतापर्यंत ऑस्ट्रेलिया ने एकूण 6 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे.
    • 1987
    • 1999
    • 2003
    • 2007
    • 2015
    • 2023
  • विराट कोहली बनला तिसऱ्यांदा ICC Player Of the Tournament
    • T20WC 2014
    • T20WC 2016
    • ODI WC 2023

2) भंडारदऱ्यात होणार देशातील पहिले वॉटर म्युझियम.

  • उत्तर अहमदनगर जिल्ह्याची जीवन वाहिनी असलेल्या प्रवरा नदीवरील भंडारदारा धरणाला लवकरच 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
  • भंडारदरा धरणाच्या शतकपूर्ती निमित्त एक भव्य कार्यक्रम करण्याच्या निमित्त या परिसरात भारतातील पहिले “वॉटर म्युझियम” उभारण्यासाठी जलसंपदा विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्त विद्यमाने जागा व निधी उपलब्ध करुन द्यावा यासाठी च्या पाठपुराव्याला यश आले.
  • 1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे.
  • भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते.
  • भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

3) डीपफेक रोखण्यासाठी कायदा होणार.

  • संसद अधिवेशनात विधेयक मांडणार
  • डीपफेक नक्की आहे काय ?
    • आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या डीपफेकद्वारे कोणाचाही व्हिडिओ अथवा छायाचित्र त्याच्यासारखा चेहरा व आवाज तयार करण्यात येतो.

4) निर्यातीला चालना देण्यासाठी आता औद्योगिक उद्यान प्रकल्प.

  • राज्य सरकारकडून नुकतीच निर्यातीला चालना देण्यासाठी चे धोरण मंजूर करण्यात आले.
  • सेझ(SEZ) आणि असाईड(ASIDE) च्या धर्तीवर निर्यातभिमुख पायाभूत सुविधा विकास कार्यक्रम हे धोरण तयार करण्यात आले आहे
  • निर्यातीमध्ये खालील शहरांचा वाटा
    ° मुंबई उपनगर 21%
    ° मुंबई 20%
    ° पुणे 17%
    ° ठाणे 8%
    ° रायगड 7%
    ° पालघर 5%
    ° छत्रपती संभाजीनगर 4%
    ° नाशिक 4%
    ° नागपूर 2%
    ° सातारा 2%

5) निकाराग्वाराची शेनीस पॅलासिओस 2023 ची विश्वसुंदरी (मिस युनिव्हर्स).

  • निकाराग्वाराचे हे पहिलेच विजेतेपद आहे
  • भारताची श्वेता शारदा हीची सर्वोत्तम वीस मध्ये निवड झाली होती.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment