Current Affairs | चालू घडामोडी | 14 TO 19 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 14 TO 19 NOV 2023

14 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर महत्त्वाच्या चालू घडामोडी

1) उच्च शिक्षणासाठी सर्वाधिक विद्यार्थी अमेरिकेत.

2) कॉप 28 (Conference of Parties)

  • संयुक्त अरब अमिराती मध्ये 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान होणार.

3) 14 नोव्हेंबर = जागतिक मधुमेह दिन

  • मधुमेहाचे नेमके कारण शोधून काढणारे डॉ. फ्रेडरिक बॅंटिंग यांचा जन्मदिन.

4) 15 नोव्हेंबर = बिरसा मुंडा जयंती
15 नोव्हेंबर= जनजातीय गौरव दिवस

  • आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करून आणि त्यांचा वारसा म्हणून केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2021 पासून महान स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला.

5) संसदेची शिस्तपालन समिती

(महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याची शिफारस नुकतीच या समितीने केली. त्यामुळे या समितीवर प्रश्न अपेक्षित)

  • 15 सदस्यीय समिती (दोन्ही सभागृहात)
  • कार्यकाळ = 1 वर्ष
  • दिल्लीत 1996 मध्ये झालेल्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहासाठी या समितीची कल्पना मांडण्यात आली
  • तेराव्या लोकसभेमध्ये विशेष अधिकार समितीने या समितीची स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली
  • तत्कालीन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती के. आर. नारायणन यांनी 4 मार्च 1997 रोजी राज्यसभेत शिस्तपालन समिती स्थापन केली होती
  • तर लोकसभेत मात्र तत्कालीन लोकसभा अध्यक्ष जी.एम.सी बालयोगी यांनी सन 2000 मध्ये शिस्तपालन समिती स्थापन केली

6) 14 नोव्हेंबर रोजी कोणाचा वाढदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो?

जवाहरलाल नेहरू

  • पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान म्हणून कधी निवडले गेले?-
    • 1947-1964 (पहिले)
  • जवाहरलाल नेहरूंच्या आत्मचरित्राचे नाव ?
    • An Autobiography
  • त्यांना भारतरत्नने कधी सन्मानित करण्यात आले?
    • 1955
  • बाल दिनानिमित्त मुलांशी संबंधित संविधानातील महत्त्वाची कलमे
    • कलम 14: समानतेचा अधिकार
    • कलम 15: भेदभावाविरुद्ध अधिकार
    • कलम 21: वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार आणि कायद्याची योग्य प्रक्रिया
    • कलम 21 अ: 6-14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिकार
    • कलम 23: तस्करीपासून संरक्षण मिळण्याचा हक्क आणि बंधपत्रित मजुरीसाठी भाग पाडले जाणे
    • कलम 24: वयाच्या 14 व्या वर्षापर्यंत कोणत्याही धोकादायक नोकरीपासून संरक्षण मिळण्याचा अधिकार
    • कलम 29: अल्पसंख्याकांचे हितसंरक्षणाचा हक्क
    • कलम 39 (ई): मुलांवर अत्याचार न करणे
    • कलम 39 (फ): मुलांना निरोगी पद्धतीने विकसित होण्यासाठी संधी आणि सुविधा दिल्या जातील
    • कलम 45: सहा वर्षांखालील मुलांसाठी प्रारंभिक बालपण काळजी आणि शिक्षण प्रदान करने
    • कलम 46: सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून दुर्बल घटकांचे संरक्षण करण्याचा अधिकार
    • कलम 47: पोषण आणि राहणीमानाचा अधिकार आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे
    • कलम 51 अ: सहा ते चौदा वर्षे वयोगटातील त्याच्या मुलाला किंवा प्रभागाला शिक्षणाची संधी द्यावी.

7) श्रीलंका क्रिकेट बोर्डामध्ये सरकारच्या सहभागामुळे ICC बोर्डाने श्रीलंका क्रिकेटचे ICC चे सदस्यत्व तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

8) 2024 ग्रॅमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या “अबंडन्स इन मिलेट्स” या भारतीय गाण्याला नामांकन मिळाले आहे.

9) भारतीय नौदल आणि बांग्लादेश नौदल यांच्यातील द्विपक्षीय सरावाची चौथी आवृत्ती – BONGOSAGAR-23 आणि दोन्ही नौदलांद्वारे ‘COORDINATE PATROL’ (CORPAT) ची पाचवी आवृत्ती 7 ते 9 नोव्हेंबर दरम्यान उत्तर बंगालच्या उपसागरात आयोजित करण्यात आली होती.

10) भारताचे आदिवासी नेते बिरसा मुंडा जयंती = 15 नोव्हेंबर

  • ते छोटानागपूर पठार परिसरातील मुंडा जमातीचा होता.
  • त्यांनी आदिवासी समाजाला इंग्रजांविरुद्ध एकत्र केले.
  • 1899 च्या उलगुलन (Great Tumult) चळवळीसाठी ते प्रसिद्ध आहेत.
  • ब्रिटीश सरकारविरुद्धच्या त्यांच्या संघर्षामुळे त्यांना 1908 मध्ये छोटानागपूर Tenancy Act मंजूर झाला. या कायद्यामुळे आदिवासी लोकांकडून बिगर आदिवासींना जमीन देण्यावर मर्यादा आली.
  • त्यांच्या सन्मानार्थ, अनेक संस्थांना त्यांची नावे देण्यात आली आहेत-बिरसा मुंडा विमानतळ रांची, सिद्धो कान्हो बिरशा विद्यापीठ इ.
  • आणि ते एकमेव आदिवासी नेते आहेत ज्यांचे चित्र भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये टांगलेले आहे.
  • 9 जून 1900 रोजी वयाच्या 25 व्या वर्षी रांची तुरुंगात त्यांचे निधन झाले.
  • 2000 मध्ये त्यांच्या जयंतीदिनी झारखंड राज्याची निर्मिती करण्यात आली.
  • त्यांचा जन्मदिवस(15 नोव्हेंबर)आता आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी भारत सरकार ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करत आहे.
  • या वर्षी,मार्च 2023 मध्ये,ओडिशाचे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम अधिकृतपणे जगातील सर्वात मोठे पूर्ण बैठक व्यवस्था असलेले हॉकी स्टेडियम म्हणून ओळखले गेले.

11) पी एम जनजाती आदिवासी न्याय महा अभियान (पी एम – जनमन) योजनेस सुरुवात = 15 नोव्हेंबर 2023

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनजाती गौरव दिनानिमित्त 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांचे जन्मस्थान असलेल्या खुंटी, झारखंड येथून ‘विकसित भारत संकल्प यात्रेला’ सुरुवात करणार आहे.

12) एक जिल्हा एक उत्पादन

  • नवी दिल्लीतील 42 व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मिळत महाराष्ट्राचा एक जिल्हा एक उत्पादन यावर भर

13) ‘कार्ल गुस्ताफ एम 4’ रॉकेट लाॅंचर भारतात बनणार= रणगाडाविरोधी शस्त्र

14) दर बारा दिवसांनी तयार होणार जगाचा नकाशा.

  • निसार= इस्रो आणि नासा यांचा संयुक्त उपक्रम

15) देशाचे बारावे मुख्य माहिती आयुक्त = हिरालाल समरिया

16) पाकिस्तानच्या ‘सिस्टर झेफ’ यांना 2023 चा Global Teacher Award.

17) बैजू पाटील यांच्या छायाचित्राला प्रथम क्रमांकाचा छायाचित्र पुरस्कार

18) मित्र शक्ती लष्करी सराव = भारत – श्रीलंका

  • पुण्यातील औंध येथे सराव

19) मोशी येथे इंद्रायणी साहित्य संमेलन.

20) पद्मश्री शितल महाजन एवरेस्ट जवळ राष्ट्रध्वजासह स्काय डायव्हिंग करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला.

21) नुकतेच नवी मुंबई मेट्रो चे उद्घाटन झाले.

  • आता चार मेट्रो नेटवर्क असणारे, महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.
    1. मुंबई मेट्रो
      • Operational : 46 Km ( 3 Lines )
      • Under Construction : 140 Km
      • Owners : MMRDA
      • Mumbai Metro Rail Corp.
    2. पुणे मेट्रो
      • Operational : 24 Km ( 2 Lines )
      • Under Construction : 30 Km
      • Owners : Maha Metro
      • PMRDA
    3. नवी मुंबई मेट्रो
      • Operational : 11 Km ( 1 Line )
      • Owner : CIDCO
    4. नागपूर मेट्रो
      • Operational : 38 Km ( 2 Lines )
      • U/C : 43 Km
      • Owner : Maha Metro

22) आरबीआयचे माजी गव्हर्नर (18 वे) एस व्यंकटरमण यांचे निधन.

23) प्रबोधनकार ठाकरे यांचा स्मृतिदिन = 20 नोव्हेंबर

24) चॅट जिपीटी चे विकासक सॅम अल्टमन यांची हकालपट्टी.

  • ओपन एआय ची धुरा मीरा मुराती यांच्याकडे
  • ओपन एआय स्थापना = 2018

25) पी एम किसान सर्वेक्षणात बीड जिल्हा देशात आव्हान.


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment