Current Affairs | चालू घडामोडी | 9 ते 13 NOV 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 9 ते 13 NOV 2023

9 ते 13 नोव्हेंबर महत्वाच्या चालू घडामोडी

1) क्यू एस मानांकनामध्ये भारताची चीनवर मात.

  • मुंबई आयआयटी देशात सर्वोत्तम

2) सलग पाच वर्ष दुष्काळाचा सामना करावा लागल्याने केनियामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करून वृक्षारोपण.

3) 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद.

  • 1994 नंतर प्रथमच महाराष्ट्राला जेतेपद
  • स्पर्धा आयोजित = गोवा
  • एकूण पदके = 228
  • सुवर्ण = 80, रौप्य = 69, कांस्य = 79
  • सर्वोत्तम महिला क्रीडापटू = संयुक्ता काळे (ठाणे)
  • सर्वोत्तम पुरुष क्रीडापटू= श्रीहरी नटराज
37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

4) मिशन महाग्राम

  • 5 जिल्ह्यांमधील 8 तालुक्यातील 104 गावांमधे विशेष प्रकल्प राबवणार
  • आयडीबीआय (IDBI) बँक भागीदार बँक

5) पूजा कदम यांना सर्वोत्तम महिला दिग्दर्शक पुरस्कार.

  • दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात झाला सन्मान

6) 66 वा महाराष्ट्र केसरी – सिकंदर शेख

  • सिकंदर शेख ठरला महाराष्ट्र केसरी . गतविजेता शिवराज राक्षेचा पराभव करत पटकावले जेतेपद
  • महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२३ मध्ये वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सिंकदर शेखने बाजी मारली.
  • पुण्यातील फुलगाव येथे झालेल्या ६६ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिंकदर शेखने गतविजेता शिवराज राक्षे यांचा पराभव करत ही मानाची स्पर्धा जिंकली.
  • 2023 चा महाराष्ट्र केसरीचे मैदान मारणारा सिंकदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवासी आहे. परंतु या स्पर्धेत त्याने वाशिम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले .
  • 2022 ची महाराष्ट्र केसरीची गदा नांदेडच्या शिवराज राक्षेने पटकावली होती.
सिकंदर शेख

7) ‘पीएम कुसुम योजने’त महाराष्ट्र अव्वल.

  • PM KUSUM = किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाभियान (कुसुम)
  • योजनेची सुरुवात = 2019
  • मंत्रालय = नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
PM KUSUM योजना

8) 2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर

  • लता मंगेशकर पुरस्कार 2023 = सुरेश वाडकर
  • पुरस्कार स्वरूप = 5 लाख रुपये
  • महाराष्ट्र शासनातर्फे हा पुरस्कार दिला जातो

9) राष्ट्रीय शिक्षण दिन = 11 नोव्हेंबर

– अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

  • त्यांनी पहिले शिक्षण मंत्री (1947-58) म्हणून काम केले.
  • त्यांना 1992 मध्ये भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले.
  • “इंडिया विन्स फ्रीडम” हे त्यांचे प्रसिद्ध लेखन आहे.
राष्ट्रीय शिक्षण दिन 2023

10) मीका = जगातील पहिली रोबो सीईओ

11) विरेंद्र सेहवागचा आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.

  • सेहवाग शिवाय भारतीय महिला संघाची माजी खेळाडू डायना एडल्जी यांचा समावेश देखील झाला आहे. आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत.
  • श्रीलंकेचा दिग्गज अरविंदा डी सिल्वा यांचाही ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे.
  • यासह ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट झालेल्या एकूण खेळाडूंची संख्या 112 झाली आहे. तर भारतीयांची संख्या 9 इतकी झाली आहे.
  • ICC हॉल ऑफ फेम मधील भारतीय
    1. बिशनसिंग बेदी
    2. सुनील गावसकर
    3. कपिल देव
    4. अनिल कुंबळे
    5. राहुल द्रविड
    6. सचिन तेंडुलकर
    7. विनू मांकड
    8. डायना एडल्जी
    9. विरेंद्र सेहवाग

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment