Current Affairs | चालू घडामोडी | 20 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 20 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 20 सप्टेंबर 1878 = द हिंदू वृत्तपत्र प्रकाशित
- सुरुवातीला साप्ताहिक असणारे हे वृत्तपत्र 1889 नंतर दैनिक झाले
- ठिकाण = चेन्नई
2) पोर्तुगालने ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ त्याच्या नावाचं विशेष Euro CR7 चे नाणे लाँच केले आहे. CR7 चे नाणे त्याच्या ऑल-टाइम लीड गोलस्कोररच्या आयकॉनिक शर्ट नंबरवरून प्रेरित असून नाणे तज्ञांच्या मते बक्कळ कमाई करून देणारं ठरलं आहे.
3) NCB Director General: अनुराग गर्ग यांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यांचा कार्यकाळ 23 मे 2026 पर्यंत असेल.
- लक्षात ठेवा
- मुख्यालय= नवी दिल्ली
- स्थापना =१७ मार्च १९८६ ;
- ऑपरेशन्स अधिकार क्षेत्र=भारत
- बोधवाक्य=आसूचना प्रवर्तन समन्वय
- बुद्धिमत्ता अंमलबजावणी समन्वय
4) मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5) सिडको चे अध्यक्ष पदी संजय शिरसाट यांची निवड
6) अमरावती येथे मित्रा पार्क योजना चे उद्घाटन झाले
- पीएम मित्रा पार्क योजनेची वैशिष्ट्ये
- ५ एफ व्हिजन-फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन
- जागतिक दर्जाच्या औद्योगिक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील
- १०२० एकर जागेमध्ये पीएम मित्रा पार्क, अमरावती
- ₹ १०००० कोटींची गुंतवणूक अपेक्षित
- १ लाख प्रत्यक्ष आणि २ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होईल
7) ‘एक देश एक निवडणूक’ मंजूर
- प्रक्रिया कशी असेल?
- पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या, तर १०० दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका.
- धोरण लागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील.
- पाच वर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल.
- कोणत्याही कारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल.
- त्यानंतर ठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल.
- आतापर्यंतचे प्रयत्न
- २०२९मध्ये ‘एक देश एक निवडणूक’साठी प्रयत्न
- कोविंद समितीकडून सात देशांतील प्रक्रियांचा अभ्यास
- जनता दल, तेलगू देसमसह ३२ पक्षांचा पाठिंबा
- या सर्व निवडणुकांसाठी मतदारांची एकच यादी तयार केली जाईल.
- एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यासाठी संसदेमध्ये घटनादुरुस्त्या कराव्या लागतील.
- लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्यासाठी राज्यांच्या मंजुरीची गरज नाही.
8) विद्यार्थ्यांना प्राचीन भारतीय गणितीय प्रणालीचे धडे. ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’शी करार
- विश्वेश्वरैया राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) आणि ‘शिक्षा संस्कृती उत्थान न्यास’, नवी दिल्ली यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. यानुसार आता आधुनिक ज्ञानासोबत भारतीय ज्ञानपरंपरेतील गणिताच्या क्षेत्रात वैदिक विद्वानांनी दिलेल्या पारंपरिक ज्ञानाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
9) चंद्रयान 4 मोहिमेला मंजुरी
- ‘इस्राो’कडे जबाबदारी; 2104.06 कोटी खर्च अपेक्षित
- याद्वारे भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी व परत आणण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित केले जाणार आहे
- ‘एनजीएलव्ही’ या प्रक्षेपण यानाच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्याची भार वाहून नेण्याची क्षमता इस्राोच्या ‘मार्क-३’च्या तुलनेत तिप्पट आहे. ‘एनजीएव्ही’चा विकास, तीन विकासात्मक उड्डाणे, आवश्यक सुविधा, कार्यक्रम व्यवस्थापन यासाठी ८,२४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
10) ‘पीएम-आशा’ला 18 सप्टेंबर रोजी मंजुरी
- कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान अन्नदाता आर्थिक उत्पन्न संरक्षण योजनेला (पीएम-आशा) योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
- पीएम – आशा = प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान
- पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून २०२५-२६ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
- उद्देश = शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाचा योग्य भाव मिळावा, ग्राहकांना वाजवी दरात अन्नधान्य उपलब्ध व्हावे
- केंद्र सरकारने मूल्यसमर्थन योजना (PSS) आणि मूल्य स्थिरीकरण फंड (PSF) या दोन योजनांचे एकत्रीकरण करून पीएम-आशा योजना सुरू केली आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या हमीभावाने खरेदीचे संरक्षण मिळणार आहे.दरातील चढ-उतार टाळून शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यात येईल. तसेच, ग्राहकांना वाजवी दरात वर्षभर अन्नधान्य उपलब्ध होईल, याची काळजी घेण्यात येणार आहे.
11) ॲनिमेशनसाठी राष्ट्रीय संस्था
- ‘आयआयटी’, ‘आयआयएम’च्या धर्तीवर ॲनिमेशनसाठी राष्ट्रीय संस्था स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. याच्या उभारणीत ‘फिक्की’ आणि भारतीय उद्याोग महासंघाचे सहकार्य असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विानी वैष्णव यांनी दिली.
12) आदिवासींसाठी योजना
- प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्राकडून मान्यता देण्यात आली.
- आदिवासी समुदायाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी ही योजना काम करेल. त्यासाठी ७९ हजार १५६ कोटी रुपयांचा निधी आहे. ६३ हजार आदिवासीबहुल खेड्यांतील पाच कोटी आदिवासी कुटुंबांना या योजनेचा लाभ अपेक्षित आहे.
13) हुबळी, कोल्हापूरसाठी पुण्याहून ‘वंदे भारत’ ची सुरुवात
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel