Current Affairs | चालू घडामोडी | 21 SEPT 2024
अनुक्रमणिका
1) 21 सप्टेंबर दिनविशेष
1.1) 21 सप्टेंबर 1968 = RAW ची स्थापना
- भारतीय गुप्तचर संघटना
- सध्याचे प्रमुख = रवी सिन्हा
1.2) 21 सप्टेंबर 2022 = REC ला महारत्न दर्जा प्राप्त
- बारावी महारत्न कंपनी
- स्थापना = 1969
2) लेबनॉन आणि सीरियामध्ये स्फोट झालेल्या पेजरच्या निर्मितीसाठी हंगेरी स्थित कंपनी जबाबदार
- हेजबोला या दहशतवादी गटाने वापरलेल्या पेजरचा लेबनॉन आणि सीरियामध्ये जवळपास एकाच वेळी स्फोट झाला होता
3) ९८ व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध
- राज ठाकरे यांच्याकडून निवड
- 2025 मध्ये दिल्ली येथे आयोजित आगामी ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध करण्यात आले
- राज ठाकरे यांनी प्रसाद गवळी, मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हीटी अँड आर्ट, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे यांच्या बोधचिन्हाची निवड केली
- बोधचिन्हात काय?
- महाराष्ट्राची अस्मिता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपरिक लेखणी बोधचिन्हात स्पष्ट दिसत आहे.
4) तिसऱ्या आघाडीची ‘परिवर्तन महाशक्ती’
- राजकीय पर्याय देण्यासाठी समविचारी नेते एकत्र
- माजी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटना आणि माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप, नारायण अंकुशे यांनी एकत्रितपणे या आघाडीची घोषणा केली.
5) हवाईदल प्रमुख पदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती
6) सरकार विरोधात समाज माध्यमांवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या हे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला देणाऱ्या आयटी कायद्यातील नियमांमध्ये केलेली दुरुस्ती घटनाबाह्य ठरविण्यात आली.
- मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र सरकार विरोधात हा निर्णय दिला आहे
7) आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र
- पंतप्रधान महाराष्ट्र सरकारच्या “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेचा शुभारंभ नुकतेच केले आहे .
- 15 ते 45 वयोगटातील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार असून, ते स्वावलंबी होऊन विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील.
- राज्यभरातील सुमारे 1,50,000 तरुणांना दरवर्षी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.
- महाराष्ट्रातील 1000 नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र या कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात येत आहे.
8) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजना
- योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना आर्थिक सहाय्य 1 लाख ते 25 लाख पर्यंत दिले जाईल
9) कर्करोगाच्या निराकरणासाठी क्वाड देशांचा उपक्रम
- अमेरिकेतील विल्मिंग्टन येथे क्वाड देशांच्या वार्षिक शिखर परिषेदला सुरुवात होणार आहे
- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि जपानचे फुमियो किशिदा उपस्थित राहणार आहेत.
10) FATF अहवाल मध्ये भारताची प्रशंसा. दहशतवाद, भ्रष्टाचार रोखण्यात यश
- दहशतवादी संघटनांना अर्थसहाय्य आणि भ्रष्टाचार रोखण्यात भारताने केलेल्या प्रयत्नांची ‘आर्थिक कृती गटा’ने (फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स – एफएटीएफ) ने स्तुती केली आहे
- भारताला ‘नियमित पाठपुरावा’ (रेग्युलर फॉलो अप) या श्रेणीत ठेवण्यात आले असून जी-२० राष्ट्रसमूहातील भारतासह ब्रिटन, फ्रान्स आणि इटली हे केवळ चार देश या श्रेणीत आहेत. या श्रेणीमुळे भारताला तीन वर्षांनी कृती अहवाल सादर करायचा असला, तरी ते बंधनकारक नाही
- एफएटीएफ चा यापुढील आढावा थेट २०३१ साली घेण्यात येणार आहे
11) बीड जिल्हयाने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा चा “स्कॉच 2024 राष्ट्रीय पुरस्कार” बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel