Current Affairs | चालू घडामोडी | 21 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 21 JUN 2024

21 जून 2024

1.1) उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस

1.2) आंतरराष्ट्रीय योग दिवस

 • सुरुवात = 2015
 • 2023 थीम = योगा फॉर वसुधैव कुटुंबकम
 • 2024 थीम = ‘स्वतःसाठी आणि समाजासाठी योग’

2) नीती आयोगाच्या गरीबी निर्देशांक अहवाल सर्वेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा सर्वाधिक गरीब

 1. नंदुरबार – 33%
 2. धुळे – 21%
 3. परभणी – 14%
 • नीती आयोग = भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे

3) भाजपचे खासदार भर्तुहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

 • ते कटक लोकसभा मतदारसंघातून 1998 पासून बिजू जनता दल (BJD) पक्षाच्या तिकिटावर 6 वेळा निवडून आले होते. या वर्षी ते भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
 • कलम 95(1) नुसार राष्ट्रपती नेमणूक करतात
  • नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे ही हंगामी अध्यक्षांची प्राथमिक जबाबदारी असते

4) जगातील सर्वांत उंच पुल जम्मू-काश्मीर मध्ये

 • जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.
 • हा पूल सांगलदनला रामबन जिल्ह्याशी जोडतो. हा पूल उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे.
  • 359 मीटर (1178 फूट) चिनाब नदीच्यावर रेल्वे पूल आहे.
  • 1315 मीटर लांब पूल बॉर्डर प्रकल्पाचा हिस्सा
  • 260 किमी प्रतितास वेगाच्या हवेचा हा पूल सामना करू शकतो.

5) मुंबई आशियातील 21वे सर्वात महागडे शहर

 • आशियातील 21वे सर्वात महागडे शहर ठरले असून नवी दिल्ली आशियातील महाग शहरांच्या यादीत 30व्या स्थानी आहे.
 • यावर्षीच्या मर्सरच्या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर राहण्यासाठी सर्वात महागड्या शहरांच्या यादीत हाँगकाँगने प्रथम स्थानी आहे.

6) खोल समुद्रात मोहीम राबणारा भारत सहावा देश.

 • भारत स्वतःचे ‘डीप सी मिशन’ अर्थात खोल समुद्रातील मोहीम राबविणारा सहावा देश बनणार असल्याचा दावा केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी केला.
 • या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग ‘मत्स्ययान-6000’ चे काम 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
 • खोल समुद्रातील दबाव झेलण्यासाठी यानावर सक्षम असे ‘टायटेनियमचे कवच’ तयार करण्याचे काम केले जात आहे.
 • डीप. सी. मिशन पूर्ण करणारे देश :-
  1) U.S.A.     2) रशिया       3) चीन
  4) फ्रान्स.       5) जपान      6) भारत

7) धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वयंम योजना

 • महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली
 • धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच ही योजना लागू
 • या योजनेअंतर्गत विविध विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे

8) बिहारमधील वाढीव आरक्षण रद्द. पाटणा उच्च न्यायालयाचा नितीश सरकारला धक्का

 • बिहारमध्ये दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींच्या आरक्षणात ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा नितीश कुमार सरकारचा गतवर्षीचा निर्णय पाटणा उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला.
 • सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या निकालांनुसार कोणत्याही परिस्थितीत ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकत नाही, हा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद उच्च न्यायालयाने मान्य केला
 • सरकारने बिहारमध्ये जातनिहाय सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणाच्या आधारे मागास आणि अतिमागासांची टक्केवारी ६३ तर अनुसूचित जाती आणि जमातींची टक्केवारी २१ असल्याचा दावा करून आरक्षण मर्यादा वाढविण्यात आली होती.
 • इंद्रा सहानी खटल्यात आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारचे मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कोणतेही राज्य ओलांडू शकत नाही, असे स्पष्ट केल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला होता.

9) बिहारच्या निकालाने मराठा आरक्षणाचे भवितव्य टांगणीला

 • महाराष्ट्रात लागू असलेले आरक्षण :
 • अनुसूचित जाती : १३, अनुसूचित जमाती – ७, इतर मागासवर्ग – १९, विमुक्त जाती व भटक्या जमाती – ११, विशेष मागसवर्ग – २, मराठा आरक्षण – १०
  • एकूण आरक्षण ६२ %
 • केंद्र सरकारचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी : १०%
  • केंद्र व राज्याचे आरक्षण एकत्रित केल्यास : ७२%

10) भारत-श्रीलंका यांच्या द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर

 • भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. या भेटीत द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला.
 • यावेळी ऊर्जा क्षेत्रात सहकार्य, बंदर पायाभूत सुविधा, विमान वाहतूक, आरोग्य, अन्न तसेच सुरक्षा, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्र आदींबाबत सहकार्याबाबत चर्चा केली. भारत आणि श्रीलंका यांच्यातील पारंपरिकपणे घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंध वाढविण्यावर यावेळी भर देण्यात आला.

11) थेट परकीय गुंतवणुकीला ओहोटी

 • वर्ष २०२३ मध्ये देशातील थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४३ टक्क्यांनी घसरली असून, ती २८ अब्ज डॉलरवर सीमित राहिली आहे
 • अहवाल = युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट
 • २०२२ मधील आठव्या स्थानावरून २०२३ मध्ये १५ व्या स्थानावर घसरला आहे.
 • मागील वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये ग्रीनफिल्ड म्हणजेच संपूर्णपणे नवीन प्रकल्प कार्यान्वयनासाठी भारत एक स्थानाने घसरून चौथा सर्वात मोठा देश ठरला
 • अहवालात नमूद केलेल्या माहितीनुसार, आघाडीच्या जी-२० अर्थव्यवस्थांमध्ये, एफडीआय प्रवाहातील सर्वात मोठी घसरण फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका आणि भारतामध्ये नोंदवली गेली आहे.
 • विकसनशील आशियातील एफडीआय ८ टक्क्यांनी घसरून ६२१ अब्ज डॉलरवर आला.
 • तथापि घसरण होऊनही चीन हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा एफडीआय ओघ मिळविणारा देश ठरला आहे.
 • 2023 FDI (कंसामध्ये 2022)
  1. अमेरिका (१)
  2. चीन (२)
  3. सिंगापूर (३)
  4. भारत (८)

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment