Current Affairs | चालू घडामोडी | 22 JUN 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 JUN 2024

1) रँडची हत्या = 22 जून 1897

  • क्रांतिकारी = दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर
  • भारतातील युरोपियन ची पहिली हत्या

2) UN शाश्वत विकास अहवाल 2024 (SDG इंडेक्स)

  • India’s Rank – 109th, with on-track performance in Poverty reduction and Quality Education targets while decreasing progress in Sustainable Cities and Climate Action targets.

3) चंद्रयान – 1 चे संचालक श्रीनिवास हेगडे यांचे निधन

  • चंद्रयान 1 मोहिमेचे संचालक श्रीनिवास हेगडे यांचं निधन झालं आहे.
  • 30 वर्षांपेक्षा अधिक काळ हेगडे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोमध्ये काम करत होते.
  • 71 वर्षीय हेगडे यांच्यावर किडनीशी निगडित आजारावर उपचार सुरू होते. त्यामध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.
  • 22 ऑक्टोबर 2008 मध्ये प्रक्षेपित( सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश येथून) केलेले चांद्रयान-1 होते. ही भारताची पहिली चंद्र मोहीम होती, ज्याने चंद्रावर पाण्याच्या रेणूंचा अभूतपूर्व शोध लावला

4) KSRTC कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांना ₹1 कोटी अपघात विमा मदत वितरीत करते

  • कर्मचाऱ्यांना 1 कोटी रुपयांची विमा भरपाई देणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरले आहे
  • कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) ने कर्तव्याच्या वेळी प्राण गमावलेल्या चार कर्मचाऱ्यांच्या आश्रितांना अपघात विमा मदत नुकसानभरपाई म्हणून प्रत्येकी ₹ 1 कोटी वितरित केले.

5) खांदेरी किल्ला संरक्षित स्मारक म्हणून घोषित

  •  अलिबाग तालुक्याजवळ अरबी समुद्रात असलेल्या बेटावर असलेला खांदेरी किल्ला हा राज्य सरकारने संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला आहे.
  • सागरी सुरक्षेच्या दृष्टीने या बेटाचे महत्त्व ओळखून १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या निर्जन बेटावर तटबंदी उभारण्याचे काम सुरू केले होते. १६७९-८० या कालावधीत महाराजांनी ब्रिटिश, पोर्तुगीज, मुघल आणि सिद्धी यांचा विरोध मोडीत काढून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले होते.
    • छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याचा प्रमुख नाविक तळ म्हणून उदयास आला.
    • यानंतरच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे कोकण किनारपट्टीवर मराठा आरमाराची बांधणी आणि साम्राज्यविस्ताराला सुरुवात केली.
    • यानंतर कोकणात सागरी वाहतुकीवर त्यांची दस्तक घेणे सर्वांना बंधनकारक केले. यामुळे संतापलेल्या ब्रिटिश आणि पोर्तुगिजांनी १२ नोव्हेंबर १७१९ रोजी या किल्ल्यावर एकत्रित हल्ला चढवला. मात्र कान्होजींनी त्यांचा पराभव केला.
    • त्यामुळे १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

6) ‘जीएसटी’ दर टप्पे कमी करा. ‘जीटीआरआय’कडून केंद्राला सुधारणांची शिफारस

  • ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय)’ या केंद्र सरकारच्या विचार मंचाने काही शिफारशी चर्चेच्या पटलावर आणल्या.
  • जीएसटी कर प्रणालीची अंमलबजावणी १ जुलै २०१७ रोजी झाली. त्यास आता ७ वर्षे होत आहेत. जीएसटी ही अप्रत्यक्ष करांची जगातील सर्वांत मोठी करप्रणाली ठरली आहे.
  • सध्या या प्रणालीवर १ कोटी ४६ लाख व्यवसायांची नोंदणी झाली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.
  • प्रमुख शिफारशी
    1. वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) दर टप्पे कमी करणे
    2. दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यवसायांना करसूटीची मर्यादेत वाढ
    3. राज्यनिहाय जीएसटी नोंदणीची पद्धत रद्दबातल करावी

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment