Current Affairs | चालू घडामोडी | 21 MAR 2024
1) आंतरराष्ट्रीय वन दिन
- सुरूवात = 2012
- 2023 थीम = Forests and Health
2) भारताच्या बचाव मोहिमा
- ऑपरेशन गंगा = युक्रेन
- ऑपरेशन देवी शक्ती = अफगाणिस्तान
- ऑपरेशन वंदे भारत = कोविड 19 मुळे परदेशात अडकलेले भारतीय
- ऑपरेशन समुद्र सेतू = कोविड 19 मध्ये समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
- ऑपरेशन कावेरी = सुदान
- ऑपरेशन अजय = इस्राएल
- ऑपरेशन राहत = येमेन
- ऑपरेशन करुणा = म्यानमार
3) निवडणुकीचा इतिहास – 2
- देश स्वतंत्र झाल्यानंतर 1977 पर्यंत 30 वर्ष काँगेस ची निर्विवाद सत्ता होती.
- एकाधिकारशाही, भ्रष्टाचार जातीपातीच्या राजकारणामुळे काँग्रेसच्या बेबंदशाहीला उलथवून टाकण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी 15 जून 1975 ला पाटण्याच्या गांधी मैदानावर संपूर्ण क्रांतीचा नारा दिला.
- त्यानंतर झालेल्या आंदोलनाला दडपण्यासाठी इंदिरा सरकारने 26 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर केली
- मात्र तरीही जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने 1977 साली झालेल्या निवडणुकीत मोठ्या फरकाने इंदिरा गांधींचा पराभव केला.
4) लडाखला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या मागणीसाठी मोर्चा
- पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे उपोषण
- लडाख या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा आणि त्याला सहाव्या अनुसूचींतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरु आहे
5) नवी दिल्ली येथे ‘स्टार्टअप महाकुंभ’ चे आयोजन
- सध्या भारत कृत्रिम प्रज्ञा मोहीम, सेमीकंडक्टर मोहीम आणि राष्ट्रीय क्वांटम मोहीम या तीन मोहिमा सरकारने सुरू केल्या आहेत. त्यातून तरूणांसाठी रोजगार निर्माण होणार असून, जागतिक गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
6) वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2024
- फिनलंड देशाने सलग सातव्यांदा अव्वल स्थान मिळवले आहे
- फिनलंड
- डेन्मार्क
- आइसलँड
- स्वीडन
- इस्राएल
- भारताने मागील वर्षी प्रमाणे 126 वा क्रमांक कायम ठेवला आहे. आनंदी मानांकन = 4.054
- 2012 पासून प्रकाशित केला जातो
- निर्देशक
- सामाजिक समर्थन
- उत्पन्न
- आरोग्य
- स्वातंत्र्य
- उदारता
- भ्रष्टाचाराचा अभाव
7) भारत-अमेरिका संयुक्त लष्करी सराव “एक्स टायगर ट्रायम्फ – 24”
- हा सराव भारताच्या पूर्व समुद्रकिनाऱ्यावर (पूर्व किनारपट्टी) विशाखापट्टणम येथे होत आहे .
- मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्यासाठी दोन्ही देशांच्या सशस्त्र दलांमधील सहकार्य सुधारणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे .
- पहिला टायगर ट्रायम्फ सराव 2019 मध्ये 9 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला होता.
- EX TIGER TRIUMPH – 24 टप्पे
- हार्बर टप्पा (मार्च 18 – मार्च 25)
- सागरी टप्पा (मार्च २५ – मार्च ३१)
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel