Current Affairs | चालू घडामोडी | 22 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 22 MAR 2024

1) 22 मार्च दिनविशेष

1.1) PETA संस्थेची स्थापना

  • स्थळ = व्हर्जिनिया
  • बोधचिन्ह = धावता ससा
  • PETA India प्रारंभ = 2000

1.2) जागतिक जल दिन

  • थीम 2024 = Leveraging Water for Peace (शांततेसाठी पाणी वापर)
  • 1993 पासून साजरा केला जातो

2) पहिल्या निवडणुकीपासून झालेले मतदान :-

  1. 1952 – 44.9%
  2. 2014 – 66.4%
  3. 2019 – 67.4% (आतापर्यंतची सर्वाधिक)
  4. 2024 – ❓

3) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक.

  • दारू धोरण प्रकरण मध्ये दोषी आढळल्याने कारवाई
  • लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल पहिलेच नेते.
  • 2014 पासून जेवढ्या ED ने कारवाया केल्या आहेत त्यातील 95% या विरोधी पक्षांवर केलेल्या आहेत.

4) किशोर राजे निंबाळकर समितीचा अहवाल सादर

  • स्पर्धा परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर २०२३ मध्ये समिती स्थापन केली होती.
  • या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून सरकार यातील सूचनांचा अभ्यास करून लवकरच कायदा करणार असल्याची माहिती आहे.

5) World Happiness Report 2024

  • फिनलंड पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान शेवटच्या स्थानी
  • भारत 126 व्या स्थानी.
  • भारत आनंदी देशात चीन, नेपाळ, युक्रेन, म्यानमार, पॅलेस्टाईन या देशांच्या मागे. 😄
  • रिपोर्ट मागील तीन वर्षांच्या सरासरी नुसार काढला जातो

6) इस्रोच्या ‘पुष्पक’ विमानाने रचला इतिहास! RLV-LEX-02 Experiment (पुष्पक)

  • भारताच्या पहिल्या रीयूजेबल लाँच व्हीकलची चाचणी यशस्वी
  • फायदा काय ?
  1. पुन्हा वापर करता येणारे लाँच व्हीईकल तयार केल्यामुळे अंतराळ मोहिमांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
  2. लाँच व्हीकलमध्ये असणारी यंत्रे, पार्ट्स अत्यंत महागडे असतात. आतापर्यंत एकदा प्रक्षेपित केलेलं यान पुढे अंतराळातच सोडून द्यावं लागत होतं. मात्र, आता या चाचणीनंतर हे यान पृथ्वीवर पुन्हा आणता येईल अशी खात्री झाली आहे.
  3. अंतराळातील कचरा होणार कमी
  • 2023 मध्ये अशा एका RLV ला वायुदलाच्या चिनुक हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आलं होतं. सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरुन खाली पडलेलं हे व्हीकल सुरक्षितपणे रनवेवर लँड झालं होतं.
  • RLV ची पहिली चाचणी 23 मे 2016 रोजी श्रीहरीकोटा येथे पार पडली होती. यानंतर काळानुसार त्यामध्ये भरपूर बदल करण्यात आले.
  • RLV = Reusable Launch Vehicle
  • कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे ही यशस्वी चाचणी करण्यात आली

7) आयपीएल मधील CSK टीमच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड

8) राज्यपाल निव्वळ नामधारी!

  • द्रमुकचे नेते के. पोनमुडी यांचा मंत्रिमंडळात समावेशाविरोधात तमिळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवि यांनी घेतलेल्या भूमिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांची खरडपट्टी काढली.
  • राज्यपाल हे राज्याचे ‘नामधारी प्रमुख’ असतात, त्यांना सल्ला देण्याइतकेच अधिकार आहेत, अशा शब्दांत खंडपीठाने त्यांची कानउघडणी केली.

9) निवडणुकीचा इतिहास – 3

  • काँग्रेसच्या नेतृत्वाला पहिल्यांदा 1977 साली तुरुंग लागला
  • डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी नेत्यांनी निवडणूक लढल्या
  • ‘समाजवादीयोने बांधि गाठ, पिछडा पावे सौ मे साठ’, ‘अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश’ या घोषणा 1977 च्या निवडणुकीत लोहिया यांनी चांगलीच गाजवली होती

10) ई कचऱ्याची समस्या

  • संयुक्त राष्ट्राच्या चौथ्या ग्लोबल ‘ई वेस्ट मॉनिटर’ या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
  • सर्वाधिक ई कचरा आशिया खंडातून

11) GRID-INDIA ने मिनीरत्न श्रेणी-I दर्जा प्राप्त केला

  • GRID कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड (GRID-INDIA)
  • स्थापना = 2009

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment