Current Affairs | चालू घडामोडी | 22 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 22 OCT 2023

1) ‘गगनयान’ च्या यानाची यशस्वी चाचणी.

  • इस्रो ने 21 ऑक्टोबर रोजी ‘गगनयान’ शी संबंधित वैज्ञानिक उपकरण वाहक चाचणी ‘फ्लाइट टेस्ट व्हेईकल अबॉर्ट मिशन-1’ (TV-D1) अवकाशयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • TV-D1 मध्ये सुधारित विकास इंजिनचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात कुपी (क्रू मोड्यूल आणि आपत्कालीन स्थितीत विलग होणारी प्रणाली (क्रू एस्केप सिस्टम) ही उपकरणे बसविण्यात आली आहेत.
  • ‘गगनयान’ चे उद्दिष्ट
    • तीन दिवसांच्या या मोहिमेसाठी 400 किमी पृथ्वीच्या कक्षेत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवणे आणि त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणण्याचे ‘इस्रो’ चे उद्दिष्ट आहे.
  • ‘गगनयान’ चे मोहीम संचालक – ‘आर-हटन’
  • अपेक्षित उड्डाण – 2025

2) ‘तेज’ चक्रीवादळ.

  • अरबी समुद्रात तयार झाले.
  • 2023 मधील मान्सून नंतरचे पहिलेच चक्रीवादळ.

3) ‘बिमस्टेक’ च्या सरचिटणीसपदी प्रथमच भारतीय.

  • सात देशांची संघटना ‘बिमस्टेक’ च्या सरचिटणीसपदी ‘इंद्रमणी पांडे’ या भारतीयाची नियुक्ती झाली.
  • प्रथमच एका भारतीयाची या पदी नियुक्ती झाली.
  • BIMSTEC (बिमस्टेक) – Bay of Bengal Initiative for Multi Sectoral Technical & Economic Co-operation.
  • बिमस्टेक सदस्य – भारत, बांग्लादेश, श्रीलंका, भुतान, नेपाळ, म्यानमार, थायलंड.
  • बिमस्टेक स्थापना – 1997 साली ‘बँकॉक declaration’द्वारे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment