Current Affairs | चालू घडामोडी | 23 APR 2024
1) पंडिता रमाबाई जयंती = 23 एप्रिल 1858
- स्थापना कार्य
- आर्य महिला समाज = 1882
- रमाबाई असोसिएशन (अमेरिका) = 1887
- ख्रिश्चन धर्माचा स्वीकार = 1883
- मुक्ती सदन
2) मुंबईला सलग तिसऱ्यांदा जागतिक वृक्ष नगरी चा पुरस्कार जाहीर
- अन्न आणि कृषी संघटना आणि आर्बर डे फाउंडेशन या दोघांमार्फत 2019 पासून हा पुरस्कार दिला जातो
3) संरक्षण खर्च करणारा भारत जगात चौथा देश
- अमेरिका
- चीन
- रशिया
- भारत
- अहवाल = स्टॉकहोम रिसर्च (सिप्रि)
4) मायकेल गिफ्किन्स पुरस्कारांच्या नामांकन यादीत श्रिया भागवत
- न्युझीलंड येथील प्रसिद्ध लेखक, समीक्षक, प्रकाशक आणि संपादक मायकेल गिफ्किन्स यांच्या नावाने देण्यात येणारा हा पुरस्कार प्रामुख्याने अप्रकाशित कथा-कादंबऱ्यांसाठी दिला जातो.
- 2018 पासून हा पुरस्कार दिला जातो आहे.
- एकूण १३ जणांच्या या यादीत भारतीय लेखिका श्रिया भागवत यांच्या ‘ॲन इंन्टरगेशन ऑफ चॉईसेस’ या कथासंग्रहाचा समावेश आहे.
- या पुरस्कारांच्या नामांकन यादीत स्थान मिळवणाऱ्या श्रिया या एकमेव भारतीय लेखिका आहेत.
5) काँग्रेसचे अर्ज बाद झाल्याने भाजपचा सुरत लोकसभा मध्ये ‘बिनविरोध’ विजय
- गुजरातच्या सुरत मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले
- १९५१पासून आजतागायत सुमारे ३५ उमेदवार लोकसभेमध्ये बिनविरोध निवडले गेले.
- २०१२ साली समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव यांच्यानंतर निवडणुकीशिवाय विजयी झालेले दलाल हे पहिलेच उमेदवार आहेत.
- भाजपचे ते पहिले बिनविरोध खासदार ठरले आहेत.
6) पद्म पुरस्कारांचे वितरण दिल्लीमध्ये करण्यात आले
🏵 पद्म पुरस्कार यादी 🏵
📌पद्मविभूषण (एकूण : 5)
- माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
- श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
- चिरंजिवी (कला)
- श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
- बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
📌पद्मभूषण (एकूण : 17)
महाराष्ट्रातून = 6
- हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
- अश्विनी मेहता (औषधी)
- राम नाईक (सार्वजनिक सेवा)
- दत्तात्रय अंबादास मायाळू उर्फ राजदत्त (कला)
- प्यारेलाल शर्मा (कला)
- कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
📌पद्मश्री (एकूण : 110)
महाराष्ट्रातून = 6
- उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
- मनोहर डोळे (औषधी)
- झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
- चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
- कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
- शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
7) बुद्धिबळाच्या ‘कँडिडेट्स’च्या महिलांच्या स्पर्धेत चीनची टॅन विजेती, हम्पी दुसऱ्या स्थानी
- ‘कँडिडेट्स’च्या महिला विभागातही अखेरच्या फेरीपर्यंत चुरस पाहायला मिळाली. अखेर चीनच्या टॅन झोंगीने ९ गुणांसह जेतेपद मिळवले.
- भारताच्या कोनेरू हम्पी आणि आर. वैशाली यांनी मिळवलेले यशही खास ठरले.
8) युझवेंद्र चहल: IPL मध्ये २०० बळी घेणारा पहिला गोलंदाज.
9) जागतिक पुस्तक दिन = 23 एप्रिल 📖
- हा वाचन, प्रकाशन आणि कॉपीराइटला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) द्वारे आयोजित केला जातो
- पहिला जागतिक पुस्तक दिन २३ एप्रिल १९९५ रोजी साजरा करण्यात आला
- या तारखेला विल्यम शेक्सपियर आणि इंका गार्सिलासो यांची पुण्यतिथी असते. तसेच इतर अनेक प्रमुख लेखकांच्या जन्माची किंवा मृत्यूची तारीख देखील हीच आहे. त्यामुळे UNESCO ने या तारखेची पुस्तक दिवस म्हणून निवड केली
10) ‘निर्भय’ सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने आज एकात्मिक चाचणी श्रेणी (ITR) अंतर्गत चांदीपूर , ओडिशा येथून स्वदेशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र “निर्भय” ची यशस्वी चाचणी घेतली.
- सबसॉनिक क्षेपणास्त्र
- ध्वनीपेक्षा हळू प्रवास करणारी क्षेपणास्त्रे “सबसॉनिक” म्हणून ओळखली जातात.
- उदा: पृथ्वी क्षेपणास्त्र (कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र)
- क्रूझ क्षेपणास्त्रे
- हे वातावरणात राहते (बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या विपरीत) आणि लक्ष्य गाठण्यापूर्वी त्याच्या उड्डाण मार्गात अंदाजे स्थिर वेगाने उडतो.
- बॅलिस्टिक क्षेपणास्त्र
- हे “फायर अँड फॉर्गेट” प्रक्षेपणासारखे आहे.
- उत्तम उदाहरण म्हणजे बंदुकीतून किंवा रिव्हॉल्व्हरमधून काढलेली गोळी
- Defence Research and Development Organisation (DRDO) = ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत असलेली प्रमुख R&D एजन्सी आहे.
- स्थापना = 1958
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel