Current Affairs | चालू घडामोडी | 23 DEC 2023
1) आमदार सुनील केदार यांना 5 वर्ष सश्रम कारावास.
- आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
- लोकप्रतिनिधीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा सुनावल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होईल , असा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये लिली थॉमस विरुद्ध केंद्र सरकार या खटल्यात दिला होता.
- मोदी आडनावाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणात सुरत न्यायालयाने काँग्रेसनेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
- त्यानंतर त्यांची खासदारकी दुसऱ्याच दिवशी सचिवालयाने रद्द केली होती.
2) डॉ. सादिका नवाब यांना उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर.
- खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिका डॉ. सादिका नवाब (सहर) यांच्या ‘राजदेव की अमराई’ या उर्दू भाषेतील कादंबरीला प्रतिष्ठित ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
- उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत.
- केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या ‘साहित्य अकादमी’ या स्वायत्त संस्थेतर्फे २४ भारतीय भाषांसाठी दिला जातो.
3) बजरंग पुनिया याचा ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा निर्णय.
- भारतीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) अध्यक्षपदी वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाल्याच्या निषेधार्थ ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीगीर बजरंग पुनिया याने ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर केला.
- पुरस्कार वापसीचा नियम काय आहे ?
- पुरस्कार विजेता कोणत्याही कारणास्तव पुरस्कार परत करण्याचा निर्णय जाहीर करू शकतो, परंतु पद्म पुरस्कारात असा कोणताही नियम नाही.
- कोणतेही कारण न देता केवळ राष्ट्रपती पुरस्कार रद्द करण्याची परवानगी देऊ शकतात.
- पुरस्कार प्राप्तकर्त्याचे नाव राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार पद्म प्राप्तकर्त्यांच्या रजिस्टरमध्ये राहते जोपर्यंत त्याचा पुरस्कार रद्द होत नाही.
4) अवध किसान सभा
- 17 ऑक्टोबर 1920 रोजी उत्तर प्रदेश मधील प्रतापगढ येथे स्थापली
- गौरी शंकर मिश्र, माता बादल पांडे, बाबा रामचंद्र, देवणारायन पांडे, केदारनाथ यांच्या प्रयत्नाने नव्या संघटनेत वाढ झाली.
5) अखिल भारतीय किसान सभा
- 1936 साली ‘लखनौ’ येथे ‘स्वामी सहजानंद’ यांनी स्थापना केली.
- 1936 साली दुसरे अधिवेशन ‘एन जी रंगा’ यांच्या अध्यक्षतेखाली ‘फैजपूर’ येथे अधिवेशन झाले.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel