Current Affairs | चालू घडामोडी | 24 DEC 2023
1) भारतीय कुस्ती महासंघाची नवनियुक्त कार्यकारिणी केंद्र सरकारकडून बरखास्त.
- बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याने झालेला वाद.
- मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याचं कारण देत बरखास्त.
- अंडर 15-19 साठीच्या ट्रायल गोंडाला घेतल्याचा एक निर्णय झाला आणि ही कारवाई.
- गेल्या दोन दिवसांपासून साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या निर्णयांमुळे सरकारवर दबाव वाढत चालला होता.
2) भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय प्राप्त केला.
- हा भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिलाच कसोटी विजय आहे. भारतीय संघाने उत्कृष्ट सांघिक प्रदर्शन करत बलाढ्य ऑसीजना ८ विकेट राखून हरवले. सामन्यात ७ बळी घेणारी स्नेह राणा सामनावीरांगना ठरली.
3) अरबी समुद्रात व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला.
- अरबी समुद्रात गुजरातच्या किनारपट्टीजवळ इस्रायलशी संलग्न असलेल्या व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला.
- तटरक्षक दलाने ‘आयसीजीएस विक्रम’ हे जहाज संकटात सापडलेल्या व्यापारी जहाजाकडे पाठविले.
4) IMF च्या कर्जाबाबतच्या अहवालाशी सरकार असहमत.
- IMF ने भारताचा आर्थिक स्थितीचा आढावा घेणारा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. यानुसार भारताचे कर्ज सातत्याने वाढत असून, केंद्र सरकारने या गतीने कर्ज घेणे सुरू ठेवले तर 2028 पर्यंत देशावर एकूण GDP च्या शंभर टक्के कर्ज होईल व ते फेडणे कठीण होऊन बसेल असे सांगण्यात आले आहे.
- याच अहवालावर भारत सरकारने असहमती दर्शवली आहे.
5) राज्याच्या चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाने नुकताच दिला हिरवा कंदील.
- उद्याोगात ३० टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या उद्याोगांना सामूहिक प्रोत्साहन योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. तसेच सर्व रस्त्यांवर २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत.
- महिला आणि बालविकास मंत्री = आदिती तटकरे
- राज्याचे महिला धोरण अष्टसूत्री असून त्यात प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, पोषण, कल्याण, शिक्षण आणि कौशल्य, हिंसाचारास प्रतिबंध, महिलांच्या उपजीविकेसाठी प्राधान्य, पायाभूत सुविधांची निर्मिती, प्रशासनात आणि राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व आणि विविध क्षेत्रांतील संवेदनशीलता अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आल्यामुळे हे धोरण महिलांसाठी प्रभावी ठरण्याची सरकारची अपेक्षा आहे.
- याशिवाय निमशासकीय व खासगी क्षेत्रात मातृत्व रजा व पितृत्व रजेची सवलत, व्यावसायिक महिलांना वस्तू आणि सेवाकर तसेच मुद्रांक शुल्कामध्ये सवलत, व्यावसायिक वाहन नोंदणी शुल्कात सवलत, व्यावसायिक वाहन महिला चालकांना विमा हप्त्यामध्ये सवलत, पूर्णत: महिलांचे व्यवस्थापन असलेल्या हॉटेलला स्थानिक करामध्ये सूट देण्यात येणार.
6) शरद पवार यांना पंजाबराव देशमुख पुरस्कार.
- संस्थेने यंदा डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त शेती, शिक्षण, सहकार, ग्रामीण विकास, सामाजिक काम या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना ५ लक्ष रुपयांचा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे.
- यंदाचा पहिला पुरस्कार अन्नधान्याच्या उत्पादनात विक्रमी वाढ घडवणारे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २७ डिसेंबरला दुपारी २ वाजता श्री शिवाजी शिक्षण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाईल.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel