Current Affairs | चालू घडामोडी | 25 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 25 DEC 2023

1) सुनील केदार यांची आमदारकी रद.

 • नुकतीच त्यांना नागपूर जिल्हा घोटाळ्यात 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
 • केदार हे नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून काँग्रेस कडून निवडून आलेले होते.
 • अपात्र ठरलेले केदार हे राज्य विधानसभेतील तिसरे आमदार आहेत.
 • १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील आठव्या कलमानुसार न्यायालयाने दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा ठोठावल्यास शिक्षा झाल्याच्या दिवसापासून खासदार वा आमदार म्हणून अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. तसेच सुटका झाल्यापासून पुढे सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी आहे.

2) दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती.

 • माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापनेसाठी समिती नियुक्त करण्यात आली.

3) दक्षिण लाल समुद्रात ‘एमव्ही साईबाबा’ या व्यावसायिक तेलवाहू जहाजावर रविवारी ड्रोन हल्ला झाला.

 • इस्रायल आणि हमासदरम्यान युद्ध सुरू झाल्यापासून इराण समर्थित हुथी बंडखोरांनी लाल समुद्रातून वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केले आहे.
 • नौदलाने अरबी समुद्रात ‘एमव्ही केम प्लुटो’ या व्यापारी जहाजावरील संशयित ड्रोनहल्ल्याचा तपास सुरू केला आहे. हे जहाज शनिवारी मुंबईकडे येत असताना गुजरातच्या किनारपट्टीजवळ त्याच्यावर हल्ला झाला. हा हल्ला हुथी बंडखोरांनी केल्याचा संशय आहे.

4) शास्त्रज्ञांपुढले 5 आव्हानात्मक प्रदेश.

A. ‘इरमिंगर समुद्र’

 • दक्षिण ग्रीनलँड आणि आईसलँडच्या दक्षिणेस असणाऱ्या पाण्याखालच्या पर्वत रांगांमधल्या जागेत असणाऱ्या जलधीला ‘इरमिंगर समुद्र’ असे म्हणतात. जगातील सर्वात बेभान वारा वाहणाऱ्या या जागेत सतत वादळे येतात.

B. ‘चॅलेंजर डीप’

 • मारियाना घळीतील हा सर्वात खोल खळगा आहे. पृष्ठभागापासून साधारण ११ किलोमीटरवर असणाऱ्या या ठिकाणी पाण्याचा दाब १००० पटीने अधिक असतो.

C. व्हिक्टोरिया लँड

 • अंटार्क्टिकाच्या सर्वात दक्षिणेकडे असणाऱ्या ‘रॉस’ समुद्राच्या संपूर्ण पश्चिम किनाऱ्याला व्हिक्टोरिया लँड म्हणतात. हे जणू हिमाचे वाळवंटच आहे, त्यातच अध्येमध्ये हिमाच्या चादरीखाली दडलेले ज्वालामुखी पसरले आहेत.

D. आर्क्टिक महासागर आणि त्याच्या हिमाखालचे सजीव.

E. अंटार्क्टिकाच्या मॅकमुर्डो या संशोधन स्थानकावर हिवाळ्यात उणे ५० अंश सेल्सिअस तापमान असते. त्यामुळे तेथे जेव्हा सूर्यास्त कधीच होत नाही अशा वेळी – केवळ उन्हाळ्यातच – येथे जगणाऱ्या प्राणीमात्रांचे आणि समुद्रपक्ष्यांचे जीवन समजावून घेऊन हवामान बदलाचे परिणाम अभ्यासले जातात

5) भारतीय संघाने रविवारी एकमेव कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा आठ गडी राखून पराभव केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला.

 • यापूर्वी डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या कसोटीत इंग्लंडच्या महिला संघाला ३४७ धावांनी नमवले होते. मायदेशात इंग्लंडविरुद्ध भारताचा हा पहिला विजय होता. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेल्या ११ कसोटीतील पहिल्या विजयाचीही भारताने नोंद केली.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment