Current Affairs | चालू घडामोडी | 24 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 24 MAR 2024

1) जागतिक क्षयरोग दिन

  • जगातील दुसरा जीवघेणा आजार (पहिला= एड्स)
  • क्षयरोग = जिवाणूजन्य (मायकोबॅक्टरियम टूबरक्युली)
  • राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन नियंत्रण कार्यक्रम = 1962 पासून
  • इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.
  • 2024 थीम : Yes! We can end TB

2) रशियात दहशतवादी हल्ला

  • रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये एका सभागृहात (कॉन्सर्ट हॉल) दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात १४३ जणांचा मृत्यू झाला.
  • सभागृहात कार्यक्रम सुरू असताना हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला.
  • इस्लामिक स्टेट या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून रशियन अधिकाऱ्यांनी ११ जणांना ताब्यात घेतले.

3) केरळ सरकारची राष्ट्रपतींविरोधात याचिका

  • केरळ विधानसभेने मंजूर केलेल्या चार विधेयकांना राष्ट्रपतींनी अद्याप मंजुरी न दिल्यावरून राज्य सरकारने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

4) महाराष्ट्रातील समस्या

  1. महाराष्ट्रात विकासाची चौकट ही राज्याच्या स्थापनेपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील विकासाने प्रभावीत झालेली आहे
  2. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या धर्तीवर मराठवाड्यातही साखर उद्योग आणले गेले
  3. यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न बिकट झाला, शेती फायद्यात राहिली नाही, शेती शिवाय अन्य रोजगारही नाही. अशी चारही बाजूने मराठवाड्याची परिस्थिती बिकट झाली.
  4. या सर्वांमुळे मराठवाड्यात जातीय आणि अस्मितावादी मागण्यांवर आधारित आंदोलन होत आहेत.
  5. विकास करायचा म्हणजे काय करायचे याची स्पष्टता राजकीय नेतृत्वाकडे नाही. तसेच नागरिकांमध्ये देखील नाही.
  6. विकास रुजवण्यापेक्षा तो दाखवण्याकडे वाढलेला कल अधिक नुकसानकारक ठरू लागलेला आहे.
  7. स्थानिक पर्यावरण, शेती, मनुष्यबळाची उपलब्धता यांसारख्या बाबी विकास प्रश्नांमध्ये मागे पडलेले आहेत
  8. महाराष्ट्रात विशिष्ट प्रश्नावर तज्ञता मिळवणारे नेतेमंडळी आता राहिलेले नाहीत.
  9. लोकप्रतिनिधींवर जनचळवळींचा दबाव राहिलेला नाही

5) निवडणुकीचा इतिहास – 5

  • 1967 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारात भारतीय जनसंघाने खालील घोषणा दिली.

“जनसंघको वोट दो, बीडी पीना छोड दो,
बीडी मे तंबाखू है, काँग्रेस वाले डाकू है”

  • जनसंघाचे संस्थापक = डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी
  • जनसंघाची स्थापना = 21 ऑक्टोबर 1951
  • स्वातंत्र्यानंतरच्या पंडित नेहरू यांच्या हंगामी मंत्रिमंडळात मुखर्जी यांनी उद्योग मंत्रीपद सांभाळले. परंतु काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टिकरणाच्या धोरणाला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला व कालांतराने जनसंघाची स्थापना केली.
  • जनसंघाचे खासदार
  • 1952 = 3
  • 1957 = 4
  • 1962 =14
  • 1967 = 35
  • 1971 = 22
  • 1967 च्या निवडणुकीत तब्बल 35 खासदार जनसंघाचे निवडून आले होते. या निवडणुकीवेळी दीनदयाळ उपाध्याय हे जनसंघाचे अध्यक्ष होते

6) ऑपरेशन इंद्रावती = हैती देश

  • हैती देशामधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अलीकडे भारताने राबवलेल्या ऑपरेशन चे नाव ऑपरेशन इंद्रावती आहे.
  • हिसांचार ग्रस्त हैतीमधून डोमिनिकन रिपब्लिक मध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात आले
  • कॅरिबियन मध्ये हैती, सशस्त्र टोळ्या रस्त्यावर आल्याने अराजकतेत उतरले आहे

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment