Current Affairs | चालू घडामोडी | 26 JAN 2024
1) भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन
- 2024 प्रमुख पाहुणे = फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
- 2023 प्रमुख पाहुणे अब्देल फताह एलसीसी = इजिप्त
- 74 व्या प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक प्राप्त
2) पद्म पुरस्कार 2024 यादी
- पद्मविभूषण (एकूण : 5)
- माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
- श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
- चिरंजिवी (कला)
- श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
- बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
- पद्मभूषण (एकूण : 17) महाराष्ट्रातून = 6
- हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
- अश्विनी मेहता (औषधी)
- राम नाईक (सार्वजनिक सेवा)
- राजदत्त (कला)
- प्यारेलाल शर्मा (कला)
- कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
- पद्मश्री (एकूण : 110) महाराष्ट्रातून = 6
- उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
- मनोहर डोळे (औषधी)
- झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
- चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
- कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
- शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
3) राष्ट्रगीताचे अमृतमहोत्सवी वर्षांत पदार्पण
- ‘जण गण मन’ या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या गीताला 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगीताची (नॅशनल अँथम) मान्यता मिळाली आणि त्याचे प्रथमच गायन झाले.
- त्याचबरोबर ‘वंदे मातरम् ‘ ला ‘जण गण मन’ च्या बरोबरीने मान दिला जाईल आणि त्याची प्रतिष्ठा राष्ट्रीय गीत (नॅशनल साँग) म्हणून राहील असे घोषित केले.
- भारतीय घटना समितीची शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच सभेत वरील दोन्ही गोष्टी स्वीकारल्याची घोषणा करण्यात आली.
- ‘जण गण मन’ = कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत ‘भारतो भाग्यो बिधाता’ या नावाने रचले होते.
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजानिक रित्या पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी गायले होते.
4) कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र
- यंदा सहा जणांना कीर्तीचक्र जाहीर झाले असून त्यापैकी तिघांना तो मरणोत्तर जाहीर झाला आहे.
- कॅप्टन अंशुमन सिंह (पंजाब रेजिमेंट, २६ वी बटालियन),
- हवालदार अब्दुल माजिद (पॅराशूट रेजिमेंट, ९वी बटालियन) आणि
- शिपाई पवनकुमार (राष्ट्रीय रायफल्स, ५५ वी बटालियन)
यांना मरणोत्तर कीर्तीचक्र जाहीर झाला आहे. - मेजर दिग्विजयसिंह रावत ( पॅराशूट रेजिमेंट, २१ वी बटालियन, विशेष दल),
- मेजर दीपेंद्र विक्रम बसनेत ( शीख रेजिमेंटमधील चौथी बटालियन),
- हवालदार पवनकुमार यादव (महार रेजिमेंट २१ वी बटालियन)
यांना कीर्तीचक्र जाहीर झाला आहे.
- १६ जणांना शौर्यचक्र जाहीर झाले आहे. त्यातील दोघांना तो मरणोत्तर दिला जाईल.
- देशात शांतता काळात दिला जाणारा कीर्ती चक्र हा अशोक चक्रानंतरचा दुसऱ्या तर शौर्य चक्र तिसऱ्या क्रमांकाचा शौर्य पुरस्कार आहे.
5) आयसीसी पुरस्कार विजेते.
- पुरुषांचे आयसीसी पुरस्कार
- आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर 2023- पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया)
- आयसीसी वनडे क्रिकेटर ऑफ द इयर 2023- विराट कोहली (टीम इंडिया)
- आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2023- उस्मान ख्वाजा (ऑस्ट्रेलिया)
- आयसीसी टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर 2023- सूर्यकुमार यादव (टीम इंडिया)
- आयसीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर 2023- रचिन रवींद्र (न्यूझीलंड)
6) सुभेदार अविनाश साबळे = अतिविशिष्ट सेवा पदक
7) संविधानभान
नव्या प्रजासत्ताकाची नांदी
- क्रिप्स मिशन (1942)
- ब्रिटिश सरकारने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना नवा प्रस्ताव देऊन भारतात पाठवले.
- ब्रिटिश साम्राज्याच्या अंतर्गत स्वराज्य (डॉमिनियन स्टेटस) देण्याचा प्रस्ताव क्रिप्स यांनी मांडला.
- तसेच इतर कॉमनवेल्थ राष्ट्रांच्या समकक्ष दर्जा देण्याचाही मुद्दा मांडण्यात आला.
- संस्थानांना स्वतंत्र रहायचे असल्यास त्यांना तो अधिकार असेल, असे या आयोगाने मांडले.
- धार्मिक आधारावर या देशाच्या दोन संविधानसभा असतील, असा मुस्लिम लीगचा आग्रह होता. त्यामुळे लीगने प्रस्तावाला नकार दिला
- तर काँग्रेस पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करत असल्याने काँग्रेसनेही क्रिप्स आयोगाच्या प्रस्तावाला विरोध केला.
- कॅबिनेट मिशन (1946)
- लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि ए. व्ही. अलेक्झांडर या तिघांनी ही योजना मांडली होती.
- सुरुवातीला याविषयी काँग्रेस आणि मुस्लीम लीग यांनी सहमती दिली मात्र पाकिस्तान मान्य न केल्याने लीगने पुन्हा विरोध केला. धर्माधारित प्रांतीय रचनेमुळे काँग्रेसने विरोध केला.
- दरम्यान या योजनेनुसार संविधान सभेसाठी निवडणुका झाल्या. काँग्रेस आणि मुस्लीम लीगचे सदस्य प्रांतिक मंडळातून निवडून आले. अखेरीस संविधान सभेच्या दिशेने पाऊल पडले.
- ६ डिसेंबर १९४६ रोजी ब्रिटिशांनी एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्याद्वारे दोन संवैधानिक सभांना मान्यता दिली गेली.
- याचाच परिणाम म्हणून ९ डिसेंबर १९४६ रोजी भारताच्या स्वतंत्र संविधानसभेची स्थापना झाली, तेव्हा मुस्लीम लीगचे सदस्य गैरहजर होते; मात्र भारतासाठी एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती.
- सुमारे तीन वर्षे प्रचंड कष्ट घेत, वाद-संवादाची परंपरा पुढे नेत भारताचे संविधान तयार झाले आणि २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताकाची स्थापना केली.
8) कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते = मार्विन ली मिंस्की हे अमेरिकन गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ मुख्यत्वे कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रणेते म्हणून प्रसिद्ध होते.
- ते एमआयटीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता या प्रयोगशाळेचे सहसंस्थापक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच तत्त्वज्ञानाशी संबंधित अनेक ग्रंथांचे लेखक होते.
- मिंस्की यांना कृत्रिम बुद्धिमत्तेमधील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी १९६९ चा ए. एम. ट्युरिंग पुरस्कार हा संगणकशास्त्रातील सर्वांत मोठा सन्मान मिळाला होता.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel