Current Affairs | चालू घडामोडी | 26 MAR 2024
1) बांगला दिवस
- बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन = 26 मार्च 1971
2) लोकसभा डिपॉझिट अर्थात अनामत रक्कम
- निवडणुकीच्या रणामध्ये एकूण मतांच्या सुमारे १६.६६ (१/६) टक्क्यांपेक्षा कमी मते पडल्यास त्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होते.
- निवडणुकीसाठी उभा राहण्यासाठी अनामत रक्कम निवडणूक आयोगाकडे भरावी लागते.
- सध्या अनामत रक्कम (2009 पासून)
[A] लोकसभा & राज्यसभा निवडणुकीत
- खुला गट = 25,000
- अनुसूचित जाती आणि जमाती = 12,500
[B] विधानसभा & विधानपरिषद निवडणूक
- खुला गट = 10,000
- अनुसूचित जाती आणि जमाती = 5,000
- 1996 साली अनामत रक्कम
[A] लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत
- खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी = 500 रुपये
- अनुसूचित जाती-जमातींसाठी = 250 रुपये
[B] विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीत
- खुल्या वर्गातील उमेदवारांसाठी = 250 रुपये
- अनुसूचित जाती-जमातींसाठी = 125 रुपये
- राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी अनामत रक्कम
- 15,000
3) अरुणाचल प्रदेश वरून चीनची पुन्हा कुरापत
- चीनचा अरुणाचल प्रदेशवरील दावा ‘मूर्खपणाचा’ व ‘हास्यास्पद’ असल्याचे सांगून भारताने तो फेटाळला असला, तरी अरुणाचल प्रदेश हा आपल्या भूप्रदेशाचा भाग असल्याचा आपला दावा चीनने कायम राखला.
4) एम.व्ही.राव ‘आयबीए’चे नवे अध्यक्ष
- आयबीए = ‘इंडियन बँक्स असोसिएशन’
- सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एम.व्ही.राव यांची बँकिंग उद्याोगाचा महासंघ असलेल्या ‘इंडियन बँक्स असोसिएशन’च्या (आयबीए) अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
- ‘आयबीए’ ही बँक व्यवस्थापन संघटना आहे
5) निवडणुकीचा इतिहास – 6
- 1977 ला आणीबाणी यांचा काँग्रेसचे सत्ता पहिल्यांदा धुळीला मिळवण्याचे काम जनता पक्षाने केले
- जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘नांगरधारी शेतकरी’ होते
- उत्तर भारतात चौधरी चरण सिंग यांनी काँग्रेस मधून बाहेर पडून 1960 मध्ये भारतीय लोकदलाची स्थापना केली होती
- आणीबाणी नंतर स्थापन झालेल्या ‘जनता पक्षात’ लोकदल पक्ष, काँग्रेस ओ, जनसंघ आणि संयुक्त समाजवादी पक्ष विलीन झाले
6) निवडणुकीचा इतिहास – 7
- बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात दोन वेळा अपयश आले
- बाबासाहेबांच्या शेड्युल कास्ट फेडरेशन ने 1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा जिंकल्या.
- मात्र स्वतः बाबासाहेबांना मुंबई राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून व 1954 च्या भंडारा पोट निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला
- मुंबई उत्तर मधून ते शेड्युल कास्ट फेडरेशन कडून उभे होते. तिथे काँग्रेसच्या नारायण सदोबा काजरोळकर यांनी त्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे काजरोळकर हे स्वतः दलित होते.
- कम्युनिस्ट पक्षाकडून श्रीपाद अमृत डांगे यांनी बाबासाहेबांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. अशोक मेहता यांच्या सोशॅलिस्ट पार्टीने मात्र बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता.
- दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बाबासाहेबांच्या विरोधात होती.
- प्रत्यक्ष निवडणुकीत पराभव झालेला असला तरी बाबासाहेबांनी नंतर राज्यसभेच्या माध्यमातून संसद गाठली
- पंडित नेहरूंचे स्वातंत्र्य आधीच्या हंगामी व नंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेब मंत्रीपदी होते
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel