Current Affairs | चालू घडामोडी | 26 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 26 OCT 2023

1) ‘एक देश एक निवडणूक’ वर विधी आयोगाचे सादरीकरण.

  • विधी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती ‘रितू राज अवस्थी’ यांनी माजी राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय समितीसमोर सादरीकरण केले.

2) ‘नमो शेतकरी’ निधीचे आज वाटप.

  • केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान कृषि सन्मान योजनेला जोडून महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान शेतकरी योजनेचा’ निधी आज वितरित केला जाईल.

3) आयनावरनातील बदलांचा ‘GMRT’ च्या साह्याने वेध.

  • अवकाशातील ‘Ionospheric Disturbance’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयनावरण घटकातील बदल टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
  • GMRT- ‘Giant Meterwave Radio Telescope’ च्या साह्याने रेडिओ लहरींचा वेध घेताना आयनावरनातील विस्कळीत होणाऱ्या रेडिओ लहरींचा अभ्यास केला.

4) अभिनेता राजकुमार राव निवडणूक आयोगाचा ‘राष्ट्रीय दूत’.

5) संयुक्त राष्ट्रांच्या (UN) वनविषयक आघाडीची बैठक भारतातील ‘डेहराडून’ येथील वन संशोधन संस्थेत.

6) पाठ्यपुस्तकांत ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ शब्दाच्या वापराची शिफारस.

  • उच्चस्तरीय समितीने NCERT ल यासंदर्भात शिफारस केली असली तरी अद्याप निर्णय नाही.
  • काय बदल सुचविले ?
    1. प्राचीन इतिहासात (Ancient Hitsory) ऐवजी अभिजात इतिहास (Classical History).
    2. ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ शब्दाचा वापर.
    3. सर्व विषयांमध्ये ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ चा वापर.

7) ग्लेन मॅक्सवेलने विश्वचषकातील सर्वात जलद शतकांचा विक्रम नावे केला.

  • ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 40 चेंडूत शतक पूर्ण केले.
  • एकदिवसीय विश्वचषकात सर्वात जलद शतकाचा ‘एडिन मार्करमचा’ (49 चेंडू) विक्रम मोडला.
  • त्याने ही किमया नेदरलँड विरुद्ध केली.

8) भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षणपदी ‘अमोल मुझुमदार’.

  • अमोल मुझुमदार हे मुंबई चे माजी कर्णधार आणि देशांतर्गत क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानले जातात.
  • याअगोदर रमेश पवार हे महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते.

9) अमेरिकेच्या ‘व्हाइट हाऊस’ कडून भारतीयांचा गौरव.

  • अमेरिकेचे अध्यक्ष ‘जो बायडेन’ यांनी गौरव मेडल प्रदान केले.
    1. अशोक गाडगीळ – ‘व्हाइट हाऊस नॅशनल मेडल टेक्नॉलजी अँड इनोवेशन’
    2. डॉ. सुब्रा सुरेश – ‘नॅशनल मेडल फॉर सायन्स’

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment