Current Affairs | चालू घडामोडी | 28 JAN 2024
1) लाला लजपतराय जयंती = 28 जानेवारी 1865
- राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष= कलकत्ता (1920)
- आयटक (AITUC) संस्थापक अध्यक्ष (1920)
- सर्वोच्च न्यायालयाची स्थापना = 28 जानेवारी 1950
- पहिले सरन्यायाधीश = हरीलाल कनिया
- 50 वे (सध्याचे) = धनंजय चंद्रचूड
2) पहिली ते दहावी सर्व शाळांना मराठी अनिवार्य
3) भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले ब्लॅकहोलचे रहस्य
- AstroSat च्या माध्यमातून ‘सिग्नस एक्स 1’ कडून येणाऱ्या एक्स रे च्या नोंदीचे विश्लेषण.
- मानवाला सापडलेल्या ‘सिग्नस एक्स १’ या पहिल्या कृष्णविवराच्या (ब्लॅकहोल) जवळून उत्सर्जित होणाऱ्या ‘एक्स रे’चे (क्ष किरण) रहस्य भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले आहे.
- या अभ्यासातून उच्च ऊर्जेच्या क्ष किरणांची उत्पत्ती कशी होते यावर भारतीय शास्त्रज्ञांनी प्रकाश टाकला आहे.
- २०१५मध्ये प्रक्षेपित झालेल्या ‘ॲस्ट्रोसॅट’ या भारतीय वेधशाळेवर असलेल्या ‘कॅडमिअम झिंक टेल्युराइड इमेजर’ (सीझेडटीआय) या उपकरणाच्या साह्याने भारतीय शास्त्रज्ञांनी हंस तारकासमूहातील कृष्णविवरांकडून येणाऱ्या क्ष किरणांच्या आठ वर्षे नोंदी घेतल्या.
4) राज्यातील पहिले बालस्नेही न्यायालय पुण्यात
- बाललैंगिक अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी उभारण्यात येणारे हे न्यायालय राज्यातील पहिले पॉक्सो न्यायालय असणार आहे.
- लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलींचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने वर्ष २०१२ मध्ये पॉक्सो कायदा केला गेला.
5) निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी लोगो आणि टॅगलाइनचे अनावरण केले.
- टॅगलाइन: ‘चुनाव का पर्व, देश का गर्व
- निवडणूक आयोगाने 2024 साली ब्रँड एंबेसडर म्हणून ‘राजकुमार राव’ यांची निवड केली आहे
6) 2014 ते 2024 पर्यंत प्रजासत्ताक दिनी आलेले प्रमुख अतिथी.
- 2024 = एम्यानुएल मॅक्रोन (फ्रान्स)
- 2023 = अब्दुल फतेह अल सिसी (इजिप्त)
- 2020 = जैर बोल्सणारो (ब्राझील)
- 2019 = सिरील रामाफोसा (दक्षिण आफ्रिका)
- 2018 = असियान संघटनेच्या दहा देशांचे प्रमुख
(2021 आणि 2022 साली कोविड मुळे कोणत्याच देशाचे प्रमुख नव्हते)
7) प्रीती रजक = लष्करातील पहिल्या महिला सुभेदार
8) इटलीचा यानिक सिन्नर ‘ऑस्ट्रेलियन ओपन’चा नवा चॅम्पियन!
- अंतिम सामन्यात त्याने रशियाच्या डॅनिल मेदवेदेव याचा 6-3, 6-3, 4-6, 4-6, 3-6 असा पराभव केला.
- ऑस्ट्रेलियन ओपनला (Australian Open 2024) तब्बल 10 वर्षांनी नवा चॅम्पियन मिळाला आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel