Current Affairs | चालू घडामोडी | 29 SEPT 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 29 SEPT 2024

1) 29 सप्टेंबर दिनविशेष

1.1) 29 सप्टेंबर 2010 = आधार कार्ड कार्यक्रम शुभारंभ

  • ठिकाण = टेंभली (ता. शहादा, जि. नंदुरबार)
  • प्रथम लाभार्थी = रंजना सोनवणे

2) ग्लोबल एरोस्पेस समिट = अबुधाबी

  • या समिटमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले
    1. एरोस्पेस तंत्रज्ञान
    2. धोरणात बदल
    3. उद्योगधंद्यात गुंतवणूक

    3) जागतिक हृदय दिन : 29 सप्टेंबर

    • जागतिक हृदय दिन हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांबद्दल (CVDs) जागरुकता वाढविण्यासाठी आणि जागतिक स्तरावर हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे.
    • इतिहास : जागतिक हृदय दिन 1999 मध्ये वर्ल्ड हार्ट फेडरेशन (WHF) ने जागतिक आरोग्य संघटना (WHO) च्या सहकार्याने तयार केला होता. हृदयविकार आणि स्ट्रोकच्या वाढत्या ओझेवर प्रकाश टाकण्यासाठी 24 सप्टेंबर 2000 रोजी पहिला अधिकृत उत्सव झाला.
    • 2011 मध्ये, WHF ने कार्यक्रमाचे मानकीकरण करण्यासाठी आणि अधिक जागतिक दृश्यमानता निर्माण करण्यासाठी प्रत्येक वर्षी 29 सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्याचा निर्णय घेतला.
    • थीम 2024 : “ युज हार्ट फॉर ॲक्शन ” 

    4) केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

    • विधानसभा निवडणुकीसाठी ‘आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान’ अशी टॅगलाइन घेण्यात आली आहे.
    • 85+ वयोगटातील आणि PWD मतदारांसाठी होमव्होटिंग सुविधा.
    • राज्यात 1 लाख 186 मतदान केंद्रे.
    • 2019 च्या तुलनेत निवडणुकीत महिलांचा सहभाग 22 टक्क्यांनी वाढला आहे.
    • गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवाराला मीडियात तीन दिवस जाहिरात द्यावी लागणार.

    5) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक .

    • एकूण विधानसभा मतदारसंघ = २८८
    • खुला वर्ग = २३४
    • अनुसूचित जमाती = २५
    • अनुसूचित जाती = २९
    • विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपत आहे.

    6) मणिपूरचे आंद्रो गाव: 2024 चे सर्वोत्कृष्ट हेरिटेज पर्यटन गाव

    • पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेच्या 2024 आवृत्तीमध्ये मणिपूरच्या आंद्रो गावाला हेरिटेज श्रेणीतील सर्वोत्कृष्ट पर्यटन गावांपैकी एक म्हणून प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
    • गावाच्या अद्वितीय सांस्कृतिक वारशात शतकानुशतके जुन्या अग्निपूजेचा समावेश आहे जे जगातील विविध भागांतील पर्यटकांना आकर्षित करते.

    7) आयफा पुरस्कार 2024

    • ठिकाण : अबु धाबी मधील यास आयलँडवर
    • आयफा पुरस्कार दिनांक : 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत 2024
    • विजेत्यांची संपूर्ण यादी:
      • सर्वोत्कृष्ट चित्रपट- संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल
      • सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान (जवान)
      • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)
      • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (बारवी फेल)
      • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अनिल कपूर (ॲनिमल)
      • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहान)
      • सर्वोत्कृष्ट खलनायकी अभिनेता- बॉबी देओल (ॲनिमल)
      • सर्वोत्कृष्ट कथा- रॉकी और रानी की प्रेम कहानी
      • सर्वोत्कृष्ट कथा (ॲडाप्टेड)- बारवी फेल
      • सर्वोत्कृष्ट संगीत- ॲनिमल
      • सर्वोत्कृष्ट गाण्याचे बोल- सिद्धार्थ गरिमा (सतरंगा, ॲनिमल)
      • सर्वोत्कृष्ट गायक- भूपिंदर बब्बल (अर्जन वेल्ली, ॲनिमल)
      • सर्वोत्कृष्ट गायिका- शिल्पा राव (चलेया)
      • भारतीय सिनेमातील अमूल्य योगदान- जयंतीलाल गडा, हेमा मालिनी सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल- करण जोहर

    Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
    MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
    Telegram Channel || WhatsApp Channel

    TelegramWhatsAppCopy LinkShare

    Leave a Comment