Current Affairs | चालू घडामोडी | 30 DEC 2023
1) 1 जानेवारी पासून UPI मध्ये होणारे बदल.
- निष्क्रिय UPI आयडी बंद होणार.
- टॅप अँड पे सुविधा येणार.
2) केंद्र सरकारचा उल्फा संघटनेसोबत ऐतिहासिक शांतता करार.
- उल्फा संघटना
◾️आसाममधील बंडखोर ‘युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम’ (उल्फा) या सर्वात जुन्या बंडखोर संघटनेने केंद्र आणि राज्य सरकारबरोबर शांतता करारावर स्वाक्षरी केली.
◾️उल्फा’ ही संघटना स्वायत्त आसामच्या मागणीसाठी 1979 पासून सशस्त्र संघर्ष करीत आहे
- करारातील प्रमुख मुद्दे
◾️शरण ‘उल्फा’च्या सदस्यांना, आदिवासीना आर्थिक साहाय्य
◾️जमीन आरक्षणासाठी नवे नियम
◾️आसाममधील आदिवासींसाठी विशेष अधिकार
◾️नागरिकत्व यादीचा फेरआढावा
◾️आसाममधील आदिवासींची संस्कृती आणि त्यांचे राजकीय अधिकार यांच्या संरक्षणासाठी विशेष तरतुदी
- आसामला स्वायत्तता मिळावी या मागणीसाठी १९७९मध्ये ‘उल्फा’ची स्थापना करण्यात आली होती
3) जालना – मुंबई वंदे भारत रेल्वे आजपासून सुरुवात.
- महाराष्ट्रातील ही सहावी वंदे भारत रेल्वे असणार आहे
1) महाराष्ट्रात पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मुंबई ते गांधीनगर सुरु झाली होती.
2) मुंबई ते सोलापूर,
3) मुंबई ते साईनगर शिर्डी,
4) मुंबई ते गोवा
5) नागपूर ते बिलासपूर
6) मुंबई ते जालना
4) नौदलाच्या गणवेशावर छत्रपतींच्या आरमाराचे प्रतिबिंब.
- भारतीय नौदलात अॅडमिरल रँकच्या अधिकाऱ्यांचे बॅज बदलले
- 1) रिअर अॅडमिरल – ब्लॅक बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी दोन फुलांची चन्हं.
- 2) सर्जन रिअर अॅडमिरल – रेड बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी दोन फुलांची चन्हं.
- 3) व्हाइस अॅडमिरल – ब्लॅक बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी तीन फुलांची चन्हं.
- 4) सर्जन व्हाइस अॅडमिरल – रेड बॉर्डर असलेल्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी तीन फुलांची चन्हं.
- 5) अॅडमिरल – ब्लॅक बॉर्डर असलेल्या मोठ्या गोल्डन पट्टीवर अँकर बटन त्याखाली नौदलाचं नवं चिन्ह त्याखाली क्रॉसमध्ये तलवार आणि छडी आणि शेवटी चार फुलांची चिन्हं.
5) IPS अधिकारी नीना सिंह बनल्या CISF च्या पहिल्या महिला महासंचालक.
- राजस्थान कॅडरच्या 1989 बॅचच्या IPS अधिकारी नीना सिंह यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- त्या महासंचालकपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
6) सहकार समृद्धीसाठी महाराष्ट्राचे केंद्राच्या धर्तीवर नवे धोरण
- त्यानुसार केंद्राच्या सहकार धोरणाच्या धर्तीवर राज्याचे नवे सहकार धोरण तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
- देशासाठी सहकार धोरण ठरविण्यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या समितीने आपला अहवाल काही दिवसांपूर्वीच केंद्राला सादर केला आहे.
- राज्य समितीमधील सदस्य
- माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी,
- राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर,
- राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ,
- बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर,
- ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे,
- अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोष कोरपे,
- गोकूळ दूध संघाचे संचालक चेतन नरके
7) ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’
- राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण व मुक्कामासाठी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
8) ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ योजना
- उद्याोगाच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये ‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस’ योजना लागू केली आहे.
- त्याद्वारे उद्याोगांच्या विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची आता प्राध्यापक म्हणून थेट नियुक्ती करण्याची मुभा उच्च शिक्षण संस्थांना दिली आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel