Current Affairs | चालू घडामोडी | 31 DEC 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 31 DEC 2023

1) सर्वात शक्तिशाली पासपोर्ट = सिंगापूर (193 देशात व्हिसा मुक्त प्रवेश)

  • सर्वात कमकुवत पासपोर्ट = अफगाणिस्तान ( फक्त 27 देशांत व्हिसा मुक्त प्रवेश)
  • भारत = 58 देशांत व्हिसा मुक्त प्रवेश
  • आकडेवारी = हेन्ले पासपोर्ट इंडेक्स, 2023

2) रश्मी शुक्ला = महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक.

  • रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पोलिस महासंचालक पद रिक्त होते.
  • महाराष्ट्र केडरच्या 1988 बॅचच्या पोलिस अधिकारी
  • त्या याआधी सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालक पदी आणि त्याआधी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत होत्या.

3) पी एम विश्वकर्मा योजना

  • Tagline = सन्मान, सामर्थ्य, समृद्धी
  • स्वरूप
    • ौशल्यांच्या अद्ययावतीकरणासाठी प्रशिक्षण तसेच 500 रुपये प्रतिदिन विद्यावेतन
    • 15 हजार रुपये मूल्यांचा अवजारांचा संच
    • 3 लाख रुपयांपर्यंतचे विनाहमी कर्ज
    • डिजिटल आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन

4) 14 ते 28 जानेवारी 2024 = मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

  • मराठी भाषा गौरव दिन राज्याभिषेक संकल्पनेवर
  • 350 वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा’ या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे
    ➖➖➖➖➖➖➖➖
    ❇️ मराठी भाषा गौरव दिन ❇️
    ➖➖➖➖➖➖➖➖
     हा दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी “विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज” यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो
  • 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून घोषित करण्यात आले.

5) UPI द्वारे आता शेअर खरेदी शक्य

  • प्रथम groww या अॅपद्वारे ही सुविधा दाखल करण्यात येईल.

6) 26 जानेवारीच्या मुख्य संचलनात सादर करण्यात येणाऱ्या बंगालच्या चित्ररथाला बाद करण्यात आले आहे.

  • या वेळी प्रस्तावित चित्ररथाचा विषय ‘कन्याश्री योजना’ होता.
  • चित्ररथाची निवड संरक्षण मंत्रालयाकडून होते.

7) 16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली असून रित्विक रंजनम् पांडेय हे या आयोगाचे सचिव म्हणून कार्य करतील.

  • इतर सदस्यांची नियुक्ती स्वतंत्र घोषणापत्रकाद्वारे करण्यात येईल.
    हा आयोग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपला अहवाल सादर करेल आणि या आयोगाच्या शिफारशी 1 एप्रिल 2026 पासून पुढील पाच वर्षे लागू असतील.
  • अरविंद पनगारिया –
    2012 – पद्मभूषण.
    2015 ते 17 नीती आयोगाचे उपाध्यक्ष.
    एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्य अर्थतज्ञ म्हणून कार्य.
  • संविधानाच्या कलम 280 नुसार भारताचे राष्ट्रपती दर पाच वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात.
  • केंद्र शासनाच्या विभाजन योग्य कर महसूलापैकी किती टक्के वाटा राज्यांना वाटून द्यावा याबद्दल केंद्रीय वित्त आयोग शिफारस करते.
  • वित्त आयोगाचे शेवटचे चार अध्यक्ष

➖१२- सी रंगराजन
➖१३- विजय केळकर
➖१४- Y.V.रेड्डी
➖१५- NK सिंग

8) राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • डॉ. करीर यांनी मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून मुख्य.सचिव पदाचा कार्यभार स्वीकारला.
  • १९८८ च्या बॅचचे अधिकारी असलेले डॉ. करीर नियुक्तीपूर्वी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment