* शिक्षक दिन *
1) NCERT ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा.
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घोषणा.
- यामुळे आता NCERT ला पदवी ते पीएचडी पर्यंतचे अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होणार आहे तसेच स्वत:चा अभ्यासक्रमही तयार करता येईल.
- विद्यापीठाच्या व्यतिरिक्त शिक्षणाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणाऱ्या शिक्षण संस्थाना UGC च्या सल्ल्यानुसार अभिमत विद्यापीठाचा दर्जा देता येऊ शकतो.
NCERT बद्दल ?
- स्थापना – 1 सप्टेंबर 1961
- HQ – दिल्ली
- कार्य – प्राथमिक शिक्षणसाठीची Nodal Agency तसेच शिक्षक शिक्षण, प्रौढ शिक्षण, संशोधनात महत्वपूर्ण योगदान.
2) इस्रो मोहिमांच्या उलटगणतील आवाज देणाऱ्या ‘N. वलरमथी’ यांचे निधन.
- चंद्रयान 3 ठरली अखेरची उलटगणती.
3) G-20 परिषदेला चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘क्षीजिनपींग’ व रशियाचे अध्यक्ष ‘व्लादिमिर पुतीन’ यांची अनुपस्थिती.
4) चंद्रयान मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हर व ‘विक्रम’ लँडर निद्रावस्थेत.
- परतीची चाचपानी करताना 40 सेंटीमिटर ची उडी मारून पुन्हा एकदा सॉफ्ट लॅंडींग केली.
- भविष्यातील चंद्रावरील माती, खडक, याचे नमुने आणण्यासाठी किंवा मानवी मोहिमांसाठी चंद्राच्या पृष्ठभागावरून पुन्हा उड्डाण करण्याच्या दिशेने हा प्रयोग करण्यात आला.
5) लिगो इंडिया
- ‘हिंगोली’ येथे गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाची स्थापना होणार आहे.
- 2030 पर्यन्त स्थापण्याचे उद्दिष्ट.
- गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणाऱ्या अमेरिकेतील ‘हँडफोर्ड’ लिव्हिंगस्टन अशा जगातील दोन प्रयोगशाळेनंतरची ही तिसरी प्रयोगशाळा.
- गुरुत्वीय लहरींचा अभ्यास करणारे इतर देश = अमेरिका, इटली, जपान.
6) ‘पापलेट’ आता राज्यमासा
- राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटिवार यांची माहिती.
- पापलेटचे दुसरे नाव ‘सीलव्हर पोम्फ्रेट’.
7) 5 सप्टेंबर= शिक्षक दिन.
- सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती.
- ते भारताचे दुसरे राष्ट्रपति तर पहिले उपराष्ट्रपती.
- जन्म = तामिळनाडू