Current Affairs | चालू घडामोडी | 01 FEB 2024
1) 01 फेब्रुवारी
- दिल्लीला राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्राचा (NCT Delhi) दर्जा = 1 फेब्रुवारी 1992
- 69 व्या घटनादुरुस्तीनुसार (1991) दर्जा प्रदान
- कलम 239 AA चा समावेश
- इंडियन कोस्ट गार्ड ची स्थापना = 1 फेब्रुवारी 1977
- शिफारस = नागचौधुरी समिती
2) 16 वा वित्त आयोग
- अध्यक्ष = डॉ. अरविंद पनगरिया
- सदस्य
- ज्येष्ठ पत्रकार आणि ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक डॉ. निरंजन राजाध्यक्ष,
- माजी व्यय सचिव अजय नारायण झा,
- निवृत्त सनदी अधिकारी अॅनी जॉर्ज मॅथ्यू आणि
- स्टेट बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष या चार नवीन सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा बुधवारी करण्यात आली.
- मराठी मातीतून चौथे प्रतिनिधित्व
- सोळाव्या वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून ‘ग्लोबल अर्थ’चे कार्यकारी संचालक आणि मिंट या अर्थविषयक दैनिकाचे माजी कार्यकारी संपादक डॉ. निरंजन राजाध्यक्ष हे आयोगाचे प्रतिनिधित्व करणारे चौथे मराठी अर्थतज्ज्ञ ठरले आहेत.
- यापूर्वी धनंजय गाडगीळ आणि विजय केळकर यांनी या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत, तर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीही वित्त आयोगात जबाबदारी निभावली होती.
3) ‘पेटीएम पेमेंट्स बँके’ला ठेवी स्वीकारण्यास बंदी
4) ‘प्रथम’ संस्थेचा अहवाल
- ‘प्रथम’ या संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘असर’ या अहवालात माहिती प्रसिद्ध.
- यामध्ये मूलभूत क्षमता व डिजिटल साक्षरता व कौशल्य यात हे विद्यार्थी खूपच मागे असल्याचे समोर आले आहे.
- या अहवालाबाबतची अजून माहिती
https://t.me/mpsc_library/1656
5) भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चे सचिव जय शाह यांची सलग तिसऱ्यांदा आशियाई क्रिकेट परिषद म्हणजेच ACC च्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
6) २०२३ मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात १८० देशांमध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. भारताची गुणसंख्या सन २०२२मध्ये ४० होती, ती घसरून ३९ झाल्याचे ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
- ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ ही संस्था सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार देशांची भ्रष्टाचार क्रमवारी ठरवते.
- संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वांत कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.
7) हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे त्यांना ED ने अटक केली आहे, आत्ताचे झारखंडचे नवीन मुख्यमंत्री म्हणून चंपई सोरेन यांनी शपथ घेतली आहे.
- चंपई सोरेन झारखंड चे ७ वे मुख्यमंत्री आहेत.
8) पाच नवीन पाणथळ क्षेत्रे जागतिक यादीत.
- आता देशातील एकूण पाणथळ क्षेत्रांची संख्या = 80
- नवीन पाणथळ क्षेत्रांमध्ये 3 कर्नाटकची असून 2 तामिळनाडू ची आहेत.
- केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी ही माहिती दिली
- 5 नवीन पाणथळ क्षेत्रे
- मागडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र, कर्नाटक
- अनकासमुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र, कर्नाटक
- अघनाशिनी नदीमुख,कर्नाटक
- कराईवेत्ती पक्षी अभयारण्य, तामिळनाडू
- लाँगवूड शोला अभयारण्य, तामिळनाडू या पाच पाणथळ क्षेत्रांचा समावेश आहे.
9) पहिला शिव सन्मान पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघराण्याच्या वतीने शिव सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.
10) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या राज्यातील 101 केंद्रांचा शुभारंभ.
- योजनेचा देशात शुभारंभ = 17 सप्टेंबर 2023
11) जातियतावाद आणि मागासलेपण मराठवाड्यातच मोठ्या प्रमाणात का ?
- जातीला सवलत मिळाली तरच आपली आणि आपल्या भागाची प्रगती होऊ शकते, ही भावना मराठवाड्यात घट्ट रुतून बसली आहे. ही भावना वाढीला लागण्यामागे खरे कारण महाग झालेल्या शैक्षणिक सुविधा आणि घसरलेली गुणवत्ता हे आहे. मराठवाड्यातून पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या अनेक मुलांना इंग्रजीत साधे पत्र लिहिता येत नाही. पण त्यांचे गुणपत्र मात्र ८० टक्क्यांच्या पुढे असते. सढळ हाताने गुण दिल्यामुळे मुलास चांगल्या महाविद्यालयात शिकविले पाहिजे, किमान स्पर्धा परीक्षेसाठी शहरात पाठविले पाहिजे, असे गावागावांतील पालकांना वाटू लागले आहे. यातून एक स्वतंत्र अर्थचक्र सुरू झाले आहे. मराठवाड्यात रोज सरासरी किमान तीन शेतकरी आत्महत्या करतात. आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीसाठी फक्त आरक्षण हाच आधार ठरू शकतो ही मानसिकता बळावली आहे. शिक्षण आणि आजारपणावर वाढलेला खर्च, शेतीतील घटलेले उत्पन्न त्यातून निर्माण झालेले प्रश्न आणि जात याची आता घट्ट सांगड बसली आहे.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel