Current Affairs | चालू घडामोडी | 06 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 06 FEB 2024

1) 6 फेब्रुवारी

  • काश्मीर संविधान सभेचा ठराव = 6 फेब्रुवारी 1954
    • ठराव = भारतात विलीनीकरणास व दिल्ली कराराला मान्यता
    • कलम 370
  • संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना = 6 फेब्रुवारी 1956
    • ठिकाण = पुणे
    • पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखालील सभेत या समितीची स्थापना
    • समिती अध्यक्ष = श्रीपाद अमृत डांगे

2) ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना.

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाचा 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादेत 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल.
  • यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल.
  • याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल.
  • पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
  • राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही योजना लागू.

3) भारत साकारतोय महासंगणकांचा ‘परम शंख’

  • ‘परम शंख’ = सध्या अस्तित्वात असलेल्या महासंगणकांपेक्षा 1 हजार पटींनी अधिक वेगवान
  • अमेरिका आणि जपान नंतर असा प्रयत्न करणारा भारत तिसरा देश
  • एक्सास्केल क्षमतेचा हा महासंगणक 2028-29 पर्यंत अस्तित्वात येईल.

4) भारतीयांना ग्रॅमी पुरस्कार

  • प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन, बासरीवादक राकेश चौरसिया तसेच शंकर महादेवन यांच्यासह तिघांच्या ‘शक्ती’ बॅंडने ग्रॅमी पुरस्कारांवर आपले नाव कोरले.
  • झाकिर हुसेन यांनी तीन, तर राकेश चौरसिया यांनी दोन पुरस्कार जिंकले.
  • गायक शंकर महादेवन, व्हायोलिनवादक गणेश राजगोपालन आणि तालवादक सेल्वागणेश विनायकराम यांच्या फ्यूजन संगीत बँड ‘शक्ती’ने ‘धीस मोमेंट’ अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत अल्बम श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार जिंकला.
  • हुसेन यांना ‘शक्ती’व्यतिरिक्त ‘पश्तों’साठी सर्वोत्कृष्ट वैश्विक संगीत कलाकृती व ‘एज वुई स्पीक’साठी वाद्य अल्बमचा पुरस्कार मिळाला.
  • ‘एज वुई स्पीक’साठीच बासरीवादक राकेश चौरसिया यांनी अमेरिकन बेंजोवादक बेला फ्लेक आणि अमेरिकन बासवादक एडगर मेयर यांच्यासह दोन ग्रॅमी पुरस्कार जिंकले.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment