Current Affairs | चालू घडामोडी | 07 FEB 2024
1) शलकी पाणबुडी सेवेत दाखल = 7 फेब्रुवारी 1992
- भारतात बांधणी केलेली पहिली पाणबुडी
2) पेपरफुटी विधेयक वैशिष्ट्ये
- संसदेत सोमवारी 5 फेब्रुवारीला परीक्षा अन्याय प्रतिबंधक विधेयक 2024 लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. या विधेयकामुळे परीक्षांमधील गैरप्रकाराला आळा बसेल.
- शिक्षा = 10 वर्ष तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांचा दंड
- पेपर लीक करणे, नक्कल करणे, अशी अनेक प्रकरणे गेल्या काही दिवसांपासून समोर आली आहे. याला आता आळा बसणार आहे.
- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेक मांडले.
3) CERT-In ला RTI पासून सूट
- केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या (RTI) कक्षेतून वगळलेल्या संस्थांच्या यादीमध्ये ‘संगणक आपत्कालीन प्रतिसाद दला’चा (CERT-In) समावेश केला आहे.
- RTI कायदा, २००५ च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समावेश होणारी CERT-In ही २७ वी संस्था आहे.
- Indian Computer Emergency Response Team (CERT-In)
- स्थापना – १९ जानेवारी २००४ (IT कायदा २००० अंतर्गत)
- मुख्यालय – नवी दिल्ली
- हॅकिंग आणि फिशिंगसारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही प्रमुख राष्ट्रीय संस्था आहे.
4) महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर आता वन भूषण पुरस्कार :-
- स्वरूप:- वीस लाख रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र
- वन आणि वन्यजीव संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे.
5) संयुक्त अरब अमिरातीमधील अबुधाबी येथे बांधण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन येत्या १४ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
6) आस्था से अयोध्या पहिली विशेष ट्रेन
- CST (मुंबई) ते अयोध्या
7) टाईम पर्सन ऑफ द इयर 2023 :-
- पर्सन ऑफ द इयर – टेलर स्विफ्ट (अमेरिकन गायिका)
- ॲथलिट ऑफ द इयर – लियोनेल मेस्सी (अर्जेंटिना)
- CEO पर्सन ऑफ द इयर – सॅम ऑल्टमन (OpenAI चे CEO)
- ब्रेकथ्रू ऑफ द इयर – ॲलेक्स नेवेल (अमेरिकन अभिनेत्री)
8) 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
- भारत अंतिम फेरीत दाखल
- उपांत्य सामन्यात बीडच्या सचिन धस याची कर्णधार उदय सहारण याच्या साथीत बहुमूल्य कामगिरी
- ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका येथे होत आहे.
9) देशातील पहिले “सी सर्वायव्हल” केंद्र गोवा येथे
10) घड्याळ चिन्ह अजित पवारांना : निवडणूक आयोगाचा निर्णय शरद पवार गटाच्या विरोधात
- विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel