Current Affairs | चालू घडामोडी | 08 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 08 FEB 2024

1) 8 फेब्रुवारी

  • निती आयोगाची पहिली बैठक = 8 फेब्रुवारी 2015
    • स्थापना = 1 जानेवारी 2015
  • लॉर्ड मेयोची हत्या = 8 फेब्रुवारी 1872
    • व्हाइसरॉय = 1869 – 1872
    • कार्य =
    • प्रथम जनगणना = 1872
    • आर्थिक विकेंद्रीकरणाचे धोरण = 1870

2) निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवे नाव बहाल = ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’

  • १९९९ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. मात्र, अजित पवार यांच्यासह पक्षातील नेते सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट)- भाजप युतीमध्ये सामील झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले.

3) समान नागरी कायदा करणारे उत्तराखंड पहिले राज्य बनले

4) पेमेंट बँक

  • रिझर्व्ह बँकेने २९ फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँकेला तिचा जवळपास सर्व व्यवसाय करण्याला प्रतिबंध करणारा आदेश दिला. याचा सर्वात मोठा फटका म्हणजे, पेटीएमला तिचा वॉलेट व्यवसाय गुंडाळावा लागेल किंवा तो अन्य बँकांकडे वळता करावा लागेल.
  • पेमेंट बँक हे २०१६ सालात विकसित केलेले बँकांचे एक नवीन प्रारूप आहे. २०१४-१५ सालचा अर्थसंकल्प मांडताना तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळ्या बँका ही संकल्पना सर्वप्रथम मांडली होती.
  • या अशा बँका आहेत, ज्या पतपुरवठा करू शकत नाहीत. शिवाय या बँकांना ठेवीदेखील एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच स्वीकारण्याची परवानगी असते. सध्या प्रति ग्राहक दोन लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत या बँका ठेवी स्वीकारू शकतात.
  • पेमेंट बँका
    • एअरटेल पेमेंट बँक,
    • इंडिया पोस्ट पेमेंट बँक,
    • फिनो,
    • पेटीएम पेमेंट बँक,
    • एनएसडीएल पेमेंट बँक
    • जिओ पेमेंट बँक

5) गांधीसागर अभयारण्य = चित्त्यांसाठी दुसरे अभयारण्य

  • चित्ता पुनर्वसन योजनेंतर्गत देशात चित्त्यांसाठी दुसरे अभयारण्य तयार करण्यात आले आहे.
  • मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात हे अभयारण्य विकसित करण्यात आले आहे.
  • सध्या कुनो नॅशनल पार्क येथे २१ चित्ते आहेत.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment