Current Affairs | चालू घडामोडी | 15 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 MAR 2024

1) 15 मार्च

 • नियोजन आयोगाची स्थापना = 15 मार्च 1950
  • भारत सरकारची असंवैधानिक आणि अवैधानिक संस्था
 • संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परीषद (UNHRC) स्थापना
  • 15 मार्च 2006
  • मुख्यालय = जिनिव्हा
 • जागतिक ग्राहक हक्क दिन

2) निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांची आकडेवारी जाहीर

 • यात केवळ २० कंपन्यांनी तब्बल ५ हजार ४२० कोटी रुपयांचे (एकूण रक्कमेच्या ४४.५९ टक्के) निवडणूक रोखे खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
 • सर्वात मोठे १० खरेदीदार
  • फ्युचर गेमिंग : १,३६८ कोटी
  • मेघा इंजिनियरिंग : ९६६ कोटी
  • क्विक सप्लाय चेन : ४१० कोटी
  • वेदांत लि. : ४०० कोटी
  • हल्दिया एनर्जी : ३७७ कोटी

3) एक देश एक निवडणूक समितीचा अहवाल सादर

 • माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केला.
 • राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करून २०२९ पर्यंत लोकसभा व विधानसभा तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणारा १८ हजार पानी हा अहवाल आहे
 • पहिल्या टप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या निवडणुका एकत्र घ्याव्या लागतील. त्यानंतर १०० दिवसांनी देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्या लागतील.
 • केंद्र सरकारने सप्टेंबर २०२३ मध्ये कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. त्यांनी 14 मार्च 2024 रोजी आपला अहवाल सादर केला
 • जर्मन प्रारुप फेटाळले
  • ‘रचनात्मक अविश्वास मत’ या जर्मनीमधील निवडणूक प्रारुपावर समितीमध्ये चर्चा करण्यात आली होती.
  • जर्मनीमध्ये अविश्वास प्रस्ताव आणताना पर्याय म्हणून सरकार बनवू शकेल अशा पक्ष व नेत्याला सकारात्मक मतदान केले जाते.
  • मात्र समितीमध्ये या प्रस्तावावर सहमती न झाल्यामुळे तो फेटाळण्यात आला.

4) ज्ञानेश कुमार, सुखबीरसिंग संधू नवे निवडणूक आयुक्त

 • केंद्र सरकारच्या समितीची शिफारस
  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी,
  2. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि
  3. लोकसभेतील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे (काँग्रेस) गटनेते म्हणून अधीररंजन चौधरी
   यांच्या समितीने नुकत्याच झालेल्या कायद्याच्या आधारे प्रथमच नव्या आयुक्तांची निवड केली.
 • नियुक्ती
  • 2023 मधे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एक कायदा केला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त एका समितीद्वारे निवडले जातात.
 • समिती
  1. PM
  2. Leader of Opposition
  3. Cabinet minister appointed by PM

5) आमची मुलगी संकेतस्थळ

 • गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची संकेतस्थळ

6) भारत ब्राझीलमध्ये टू प्लस टू चर्चा

7) मानव विकास निर्देशांक (HDI) 2022 जाहीर

 • HDI 2022 = 134 वा क्रमांक 193 देशांतून
  • मूल्य = 0.644
 • HDI 2021 = 135 वा क्रमांक 191 देशांतून
  • मूल्य = 0.633
 • अहवालाचे नाव = ‘ब्रेकिंग द ग्रिडलॉक: रीइमेजिनिंग कोऑपरेशन इन ए पोलराइज्ड वर्ल्ड’
 • १९९० च्या तुलनेत आयुर्मान ९.१ वर्षांनी वाढले आहे.
 • संयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रम (यूएनडीपी) ने अहवाल सादर केला आहे.
 • 3 निर्देशक
  • Long Healthy life
   • life expectancy at birth
  • Access to Knowledge
   • expected year of schooling
   • mean year of schooling
  • Decent Standard of Life
   • per capita GNI
   • पहिले 10 देश
    1. Switzerland
    2. Norway
    3. Iceland
    4. Hong Kong
    5. Denmark
    6. Sweden
    7. Germany
    8. Ireland
    9. Singapore
    10. Australia
   • गरीब देशांमध्ये आफ्रिकन देशांचा समावेश आहे. यामध्ये सिअरा लिओन, येमेन, माली, सोमालिया आदी देशांचा समावेश आहे.

   8) लैंगिक असमानता निर्देशांक (GII) 2022 जाहीर

   • 2022 = 108 वा क्रमांक 193 देशांत
    • मूल्य = 0.437
   • 2021 = 122 वा क्रमांक 191 देशांत
    • मूल्य = 0.490
   • 14 स्थानांनी प्रगती केली आहे.
   • जीआयआय प्रामुख्याने
    • प्रजनन आरोग्य (Health)
    • सशक्तीकरण (Empowerment)
    • श्रमिकांची बाजारपेठ (Labour Market)
     या तीन घटकांवर मोजला जातो.
   • भारताचा जीआयआय जागतिक सरासरी ०.४६२ च्या तुलनेत चांगला असून तो ०.४३७ इतका आहे.
   • २०१४ मध्ये जीआयआय १२७ क्रमांकावर होता जो आता १०८ झाला आहे.

   9) रणजी ट्रॉफी 2024

   • विजेता:मुंबई
   • उपविजेता: विदर्भ
   • अंतिम सामन्यात विदर्भ संघाचा पराभव करुन, मुंबई संघाने 42 व्यांदा रणजी करंडक जिंकला.
   • अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला.
   • मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने रणजी जेतेपदासह आपल्या प्रथमश्रेणी कारकीर्दीची सांगता केली.

   10) स्टारशिप यानाची यशस्वी चाचणी. पृथ्वीच्या दिशेने परत येताना संपर्क तुटला

   • जगातील हे सर्वात ताकदवान यान आहे
   • एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स या खाजगी कंपनीचे हे यान आहे
   • भविष्यात अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे उद्दिष्ट

   11) निवडणूक रोख्यांमधील (Electoral Bond) सर्वाधिक निधी भारतीय जनता पार्टीला

   1. भाजपा = 6060.51 cr (47.5%)
   2. तृणमूल काँग्रेस = 1609.53 cr
   3. काँग्रेस = 1421.87 cr
   4. भारत राष्ट्र समिती (BRS) = 1214.71 cr
   5. बिजू जनता दल (BJD) = 775.50 cr
   • एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 मधील ही माहिती आहे
   • एकूण 12,769.09 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे या काळात खरेदी करण्यात आले

   12) पर्यटकांसाठी ‘भवन’ बांधण्यासाठी काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे

   • श्रीनगर विमानतळाजवळील इचगाम येथे २.५ एकर जागेवर महाराष्ट्र भवन उभारले जाणार आहे.

   Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
   MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
   Telegram Channel || WhatsApp Channel

   Leave a Comment