१) PM विश्वकर्मा योजना
- देशातील विविध १८ प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत देणाऱ्या ‘ PM विश्वकर्मा ‘ योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी.
- पुढील ५ वर्षासाठी केंद्राकडून १३ हजार कोटींची तरतूद
- पारंपरिक कारागिरांना एकाच वेळी कमाल २ लाख रुपयांचे कर्ज विनातारण, सवलतीच्या व्याजदराने उपलब्ध होणार.
- सुरुवात १७ सप्टेंबर २०२३ ( विश्वकर्मा जयंती )
- लाभ – सुतार , धोबी, शिंपी, कुंभार, मोची, गवंडी, लोहार, शिल्पकार, पाथरवट, केशकर्तनकार, बोट निर्माते, मच्छीमार जाळी विणकर, शश्त्रे हातोडी उत्पादक,कुलूप निर्माते, हार बनविणारे, पारंपरिक खेळणी उत्पादक.
२) सर्वात परवडणारे शहरांच्या यादीत ‘ अहमदाबाद ‘ पहिल्या स्थानावर
- पुणे, कोलकत्ता २ ऱ्या
- मालमत्ता क्षेत्रातील नाईट फ्रॅंक संस्थेने अहवाल जारी केला.
३) वंचित शेतकर्यांना कर्जमाफी
- २०१७ – फडणवीस सरकारने ‘ छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान ‘ योजने अंतर्गत कर्जमाफी योजना.
- महाविकास आघाडीने या ऐवजी ‘ महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना ‘ लागू
४) चांद्रयान ३ चंद्राच्या अखेरच्या कक्षेत दाखल
- २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरणार
५) नेयमार आता ‘ अल हिलाल ‘ संघाकडून खेळणार
- यापूर्वी’ पॅरिस सेंट जर्मन ‘ संघातर्फे ६ हंगाम खेळला .