Current Affairs | चालू घडामोडी | 21 FEB 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 21 FEB 2024

1) 21 फेब्रुवारी

 • शामाप्रसाद मुखर्जी रूर्बन मिशन घोषित = 21 फेब्रुवारी 2016
  • स्थळ = कुरुभाट (छत्तीसगड)
  • वैशिष्ट्य = ग्रामीण आत्मा व शहरी सुविधा असलेली क्लस्टर बनवणे
 • सर्वोच्च न्यायालयात AI चा सर्वप्रथम वापर = 21 फेब्रुवारी 2023
 • जागतिक मातृभाषा दिन = 21 फेब्रुवारी
  • दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी जगभरात साजरा केला जातो.
  • हा दिवस जगभरातील लोक वापरत असलेल्या सर्व भाषांच्या जतन आणि संरक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे.
  • UNESCO ने नोव्हेंबर 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा ‘जागतिक मातृभाषा दिवस’ म्हणून घोषित केला होता.
  • हा दिवस 2000 पासून जगभरात साजरा केला जात आहे.
  • हा दिवस साजरा करण्याची कल्पना बांगलादेशने दिली होती.

2) मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण

 • मराठा आरक्षण कायद्याचा प्रवास
  • ९ जुलै २०१४- शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग (ईएसबीसी) १६ टक्के आरक्षण अध्यादेश
  • २०१५ – विधेयक मंजूर
  • ९ जानेवारी २०१५ – राज्यपालांची मान्यता
  • उच्च न्यायालयात हा कायदा टिकला नाही
  • २०१७ मध्ये गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाकडे मराठा आरक्षण विषय सुपूर्द
  • गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या आधारावर ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पुन्हा मराठा आरक्षण विधेयक मंजूर. १६ टक्के आरक्षणाची तरतूद.
  • उच्च न्यायालयाकडून कायद्याचे समर्थन, परंतु मराठा आरक्षणाच्या टक्केवारीत कपात
  • सरसकट १६ टक्क्यांऐवजी शिक्षणासाठी १२ टक्के व सरकारी नोकऱ्यांसाठी १३ टक्के आरक्षण लागू करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश
  • सर्वोच्च न्यायालायने ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण कायदा असंविधानिक ठरवून रद्द केला. त्यावरील पुनर्विलोकन याचिका फेटाळली, सुधारात्मक याचिका (क्युरेटिव्ह ) प्रलंबित.
  • २० फेब्रुवारी २०२४ नव्याने सामाजिक व शैक्षण मागास प्रवर्ग तयार करुन मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळात मंजूर.
 • 2a) राज्यात आता एकूण 72 टक्के आरक्षण
 • कोणत्या गटाला किती आरक्षण ?
  • अनुसूचित जाती : १३ टक्के
  • अनुसूचित जमाती : ७ टक्के
  • इतर मागासवर्ग : १९ टक्के
  • विमुक्त जाती व भटक्या जमाती : ११ टक्के
  • विशेष मागासवर्ग : २ टक्के
  • प्रचलित आरक्षण : ५२ टक्के
  • मराठा आरक्षण : १० टक्के (नव्याने)
 • एकूण आरक्षण 72 टक्के
  • राज्य सरकारचे एकूण आरक्षण : ६२ टक्के
  • केंद्र सरकारचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक : १० टक्के
  • केंद्र व राज्याचे आरक्षण एकत्रित केल्यास महाराष्ट्रात एकूण ७२ टक्के आरक्षण

3) टीव्हीएस मोबिलिटी आणि मित्सबिशी यांचा करार

 • जापानी उद्योगसमूह मित्सबिशी भारतात वाहनविक्री क्षेत्रात करणार प्रवेश

4) जपानची भारतात 13 हजार कोटींची गुंतवणूक

 • विविध क्षेत्रातील 9 प्रकल्पांना मदत

5) चंदीगड मध्ये आप चा महापौर

 • सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा
 • निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी जाणीवपूर्वक मतपत्रिकांमध्ये फेरफार केल्याचा ठपका ठेवला
 • काही दिवसांपूर्वीच निवडणूक अधिकाऱ्याने भाजपाच्या उमेदवाराला विजेता घोषित केले होते. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले

6) मालवाहतुकीसाठीचा देशातील सर्वात लांब बोगदा खुला

 • उधमपूर – श्रीनगर – बारामुल्ला रेल लिंकचा भाग असलेला हा बोगदा आहे.
 • याच बोगद्यातून काश्मीर खोऱ्यातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे गाडी धावली
 • पंतप्रधान मोदींच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे श्रीनगर ते संगलदान व संगलदान ते श्रीनगर या रेल्वेगाड्यांचे लोकार्पण.
 • पंतप्रधानांच्या हस्ते बनिहाल-खारी-सुंबर-संगलदान या रेल्वे मार्गिकेचेही लोकार्पण.
 • ४८.१ किमी लांबीच्या याच मार्गावर देशातील सर्वांत लांब म्हणजे १२.७७ किमीचा रेल्वे बोगदा आहे.
 • या बोगद्याचे काम २०१० मध्ये सुरू झाले होते. या बोगद्यास टी-५० या नावानेही ओळखले जाते.

7) शक्तिपीठ महामार्ग

 • नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग ८०२ किमीचा असणार आहे.
 • वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून हा महामार्ग जाईल.
 • १२ जिल्ह्यांतील देवस्थानांना जोडण्यासाठी आंतरबदल मार्गांची आखणी केली आहे. पवनार, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबेजोगाई, सिद्धेश्वर, तुळजापूर, पंढरपूर, महालक्ष्मी, पत्रादेवी अशी देवस्थाने यामुळे जोडली जातील.

8) संविधानभान

 • जॉन स्टुअर्ट मिल
  ‘आपल्या कृतींमुळे इतरांच्या स्वातंत्र्याची हानी होत नाही तोवर स्वातंत्र्य असले पाहिजे.’

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment