चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिलं देश.
प्रक्षेपण =14 जुलै 2023 (by LVM3 लॉंच vehicle)
चंद्रावर पोहचले =23 ऑगस्ट 2023
दक्षिण ध्रुव महत्वाचा का ?
या ठिकाणी मोठमोठी ठिवरे आहेत. यात बर्फ असण्याचा अंदाज, जर बर्फ मिळाले तर याचा वापर भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी होईल.
पाण्याचे विघटन करून इंधन म्हणून हायड्रोजन व श्वासनासाठी ऑक्सिजन ची निर्मिती शक्य.
या मोहिमेचे महत्व काय ?
गेल्या 70 वर्षात विविध देशनी जवळपास 111 चंद्रमोहिम हाती घेतल्या. त्यापैकी फक्त 8 यशस्वी ठरल्या आहेत. आपली चंद्रयान -3 ही नववी यशस्वी मोहीम.
चंद्राचा पृष्ठभाग,तेथील वातावरणाचे आयाम, तिथे असणारे क्षार, पानी या सगळ्याच अभ्यास करणे भविष्यासाठी गरजेचे
भविष्यात चंद्रावर वसाहत निर्माण करणे, चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति व ‘एस्केप velocity’ कमी असल्याने चंद्राचा उपयोग करून आंतरग्रह मोहिमेसाठी चंद्राचा अभ्यास करणे गरजेचे.
‘ISRO’ विषयी
‘इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च’ ही संज्ञा 1962 साली स्थापन.
15 ऑगस्ट 1969 रोजी याचे रूपांतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनाइज़ेशन’ म्हणजेच isro मध्ये झाले.
‘विक्रम साराभाई’ यांच्या नेतृत्वाखाली ‘इस्रो’ ची स्थापना.
1975 साली ‘आर्यभट्ट’ या उपग्रहाचे रशियाच्या रॉकेटच्या सहयाने प्रक्षेपण.
अमेरिकेने त्यावेळी तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यास नकार दिला होता. असे असताना भारतीय अभियंत्यानी cryogenic एंजिनांचा विकस स्वबळावर करून दाखवला गेला.
शून्याखाली 150 अंशावर राखले जाणारे इंधन जाळून गतीज ऊर्जा देऊ शकणारी इंजिने ‘cryogenic’ नावाने ओळखली जातात.
1980 साली डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली उपग्रह प्रक्षेपणाचे पहिले रॉकेट (LLV3) अवकाशात झेपावले आणि ‘रोहिणी उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरू लागला.
त्यानंतर इस्रो ने ‘इन्सॅट’ सारख्या उपग्रहांची निर्मिती केली. ज्यामुळे दूरसंचार क्षेत्रात क्रांतीच घडली.
‘नाविक’ उपग्रहशृंखलेमुळे स्वदेशी ‘GPS’ सुविधा उपलब्ध.
त्यानंतर अनेक महत्वाच्या मोहीम ( चांद्रयान 1, मंगल्यान 1 ) इस्रो ने हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण केल्या.
चंद्रावरील इतर
भारत चंद्रावर उतरणारा चौथा देश ठरला.
रशिया (USSR), अमेरिका, चीन,ही इतर देश.
1969, 20 जुलै रोजी मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. ही अमेरिकेची ‘अपोलो’ ची 11 वी फेरी होती.
‘नील आर्मस्ट्रँग’ हा सदेह चंद्रावर उतरला.
इस्रोच्या आगामी मोहीमा
आदित्य L1 =सूर्यमोहीम
गगनयान = मानवी मोहीम
मंगळयान 2 = मंगळ मोहीम
शुक्रयान 1 = शुक्र मोहीम
चंद्रयान 3 चे शिल्पकार
S. सोमनाथ = इस्रो अध्यक्ष
P. वीरामुथुवेल = प्रकल्प संचालक
S. मोहनकुमार = मोहीम संचालक
S. उन्नीकृष्णन नायर = संचालक ( विक्रम साराभाई स्पेस सेंटर )