Current Affairs | चालू घडामोडी | 31 MAR 2024
1) प्रार्थना समाजाची स्थापना = 31 मार्च 1867
- संस्थापक = आत्माराम पांडुरंग तरखडकर
- स्थळ = मुंबई
- समाजाच्या प्रसारासाठी ‘सुबोध पत्रिका’ वृत्तपत्राची सुरुवात
2) सर्वात मोठा मतदार संघ = तेलंगणातील मलकाजगिरी
- सर्वात लहान मतदारसंघ = लक्षद्वीप
3) राष्ट्रपतींच्या हस्ते 3 भारतरत्न पुरस्कार प्रदान
- चौधरी चरणसिंग
- पी व्ही नरसिंहराव
- डॉ. एम एस स्वामिनाथन
- 2024 या वर्षात एकूण 5 व्यक्तींना भारतरत्न देण्यात आलेला आहे .
- कर्पुरी ठाकूर
- एल के अडवाणी
- एकूण भारतरत्न = 53
4) चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत
- चिपको आंदोलनाला नुकतीच (२६ मार्च) ५० वर्षे पूर्ण झाली. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी तसेच जंगलांच्या संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यातील (आताचा उत्तराखंड) या अहिंसक चळवळीचे लोण पुढल्या सर्व काळात देशभर पसरले होते.
- चिपको आंदोलन = 26 मार्च 1974
- चंडीप्रसाद भट्ट, गौरादेवी हे या चळवळीतील काही प्रमुख कार्यकर्ते होते
- 1980 साली केरळात केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या मार्क्सवादी कार्यकर्त्यांनी एका चळवळीची धुरा उचलली. आरंभी शास्त्रीय साहित्य प्रकाशित करणे एवढेच उद्दिष्ट समोर ठेवलेल्या या संघटनेने आता ‘समाज क्रांतीसाठी विज्ञान’ असे आपले ध्येय ठरविले. यातील एक उपक्रम म्हणजे चाळियार नदीच्या प्रदूषणाचा अभ्यास.
- केरळ येथे झालेल्या चळवळीला सायलेंट व्हॅली संरक्षण चळवळ देखील म्हंटले जाते
5) राज्यातील भूजल पातळी 1.01 मीटरने कमी
- राज्याच्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेतर्फे दरवर्षी ऑक्टोबर आणि जानेवारी या दोन महिन्यात भूजल पातळीची तपासणी केली जाते.
- 2024 मधील जानेवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणातील राज्यातील पाण्याची पातळी 1.01 मीटरने कमी झाल्याचे आढळले
6) लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम गमावण्यात महाराष्ट्र आघाडीवर
7) डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार
- संत विचार प्रबोधिनी आणि डॉक्टर रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठान तर्फे हा पुरस्कार दिला जातो
- अमृताश्रम स्वामी महाराज (अमृत महाराज जोशी) यांना डॉ. रामचंद्र देखणे किर्तन सेवा पुरस्कार
- शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे आचार्य हेमंतराजे मावळे यांना डॉ. रामचंद्र देखणे लोककला सेवा पुरस्कार
- यंदा पुरस्काराचे दुसरे वर्ष आहे. 21 हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप.
8) निवडणुकीचा इतिहास – 12
- 1996 ला 13 दिवस, 1998 ते 99 या काळात 13 महिने तर 1999 ते 2004 अशी पाच वर्ष… अशा चढत्या क्रमाने भारतीय जनता पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी मित्र पक्षांच्या सहाय्याने ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे’ सरकार चालवले
- 2004 च्या निवडणुकीत भाजपने ‘इंडिया शायनिंग’ अशी घोषणा केली.
- सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करून शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही घोषणा केली होती.
- त्या वेळचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने सिताराम केसरी या ज्येष्ठ नेत्याला पक्ष नेतृत्वावरून हटवून सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षांची सूत्रे दिली.
- 2004 च्या निवडणुकीत भाजप पराभूत होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर आले
- मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचे यूपीए सरकार सत्तेवर आले. सोनिया गांधींच्या परदेशी जन्माचा मुद्दा या निवडणुकीनंतर गाजला.
Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel