Current Affairs | चालू घडामोडी | 5 OCT 2023

Current Affairs | चालू घडामोडी | 5 OCT 2023

CURRENT AFFAIRS

1) नोबेल पुरस्कार 2023- रसायनशास्त्र

  • अमेरिकेतील
  1. मोंगी बवेंडी
  2. लुईस ब्रुस
  3. अलेक्सी एकिमोव्ह
  • संशोधन – तेजस्वी रंगीत प्रकाशकिरण फेकणाऱ्या ‘क्वांटम डॉट्स’ मध्ये पथदर्शी संशोधन.
  • या संशोधनामुळे दूरचित्रवाणी संचासारख्या इलेक्ट्रोनिक उपकरणांसह शास्त्रक्रियांमद्धे क्रांतिकारी बदल.

2) अमेरिकेमध्ये ‘केविन मॅकार्थी’ यांची सभापती पदावरून गच्छंती.

  • अमेरिकेच्या कॉंग्रेस या कायदेमंडळाच्या हाऊस ऑफ रीप्रेझेंटेटीव्ह या कनिष्ठ सभागृहाचे स्पीकर ‘केविन मॅकार्थी’ यांना पद सोडावे लागले.
  • अमेरिकी कॉँग्रेसच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडली.

3) हवाई दलाच्या ताफ्यात ‘LCA तेजस’

  • ‘हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स Ltd’ (HAL) ने पहिले ‘LCA तेजस’ विमान भारतीय हवाई दलाला सुपूर्द केले.
  • ‘LCA तेजस – ‘Light Combat Aircraft’ तेजस.
  • या विमानामुळे भारत उच्च क्षमता असलेल्या देशांच्या यादीत सामील.

4) NPCI इंटरनॅशनलचा ‘अल इतिहाद पेमेंट्स’ सोबत करार.

  • ‘National Payment Corporation of India’ (NPCI) ची आंतरराष्ट्रीय उपकंपनी ‘NPCI International’ कडून UAE च्या ‘अल इतिहाद पेमेंट्स’ सोबत करार.
  • याआधी NPCI ने फ्रांसच्या ‘लायरा’ सोबत 2022 मध्ये तर त्यानंतर सिंगापूरच्या ‘पे नाऊ’ सोबत करार केलेल्या आहे.

5) 97 वे मराठी साहित्य संमेलन, अमळनेर (जळगाव)

  • 2,3 व 4 फेब्रुवारी 2024 मध्ये होणार.
  • याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बोधचिन्हासाठी स्पर्धा घेण्यात आली होती त्यात प्राचार्य ‘डॉ. मिलन भामरे’ यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाची निवड करण्यात आली.

6) पुणेरी मेट्रोमध्ये अत्याधुनिक ‘थर्ड रेल सिस्टीम’

  • थर्ड रेल प्रणाली उपलब्ध करून देणारा हा पहिलाच उपक्रम ठरणार.
  • यामुळे मेट्रोच्या मार्गांवर कुठेही गाडीच्या बाजूने किंवा डोक्यावर इलेक्ट्रिक्स च्या खांबांचे किंवा तारांचे जाळे दिसणार नाही.
  • थर्ड रेल प्रणाली म्हणजे काय ?
    • यालाच लाईव्ह रेल / इलेक्ट्रिक रेल / कंडक्टर रेल म्हणतात.
    • मेट्रो गाडीला सतत विद्युत पुरवठा करण्याची आधुनिक पद्धत.
  • फायदे ?
    • विद्युतवाहक तारा नसल्याने दृष्टीसौंदर्यात बाधा नाही.
    • पक्षी किंवा पतंग तारांमध्ये अडकून मेट्रोच्या विद्युत पुरवठ्याला अडथळा राहणार नाही.

7) आशियायी क्रीडा स्पर्धा 2022

  • नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक.(थ्रो – 88.88मीटर)
    • भालफेकिमध्येच रौप्य पदक भारताच्या किशोर जेना ने पटकावले.(थ्रो – 87.54 मीटर)
  • 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीत मोहंमद अनस याहिया, अमोज जेकब, मोहंमद अजमल, राजेश रमेश या जोडीने सुवर्णपदक पटकावले.
  • तिरंदाजीत कंपाउंड प्रकारात महाराष्ट्राच्या ओजस देवताळे व अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नम या जोडीने सुवर्णपदक पटकावले.
  • 5000 मीटर शर्यतीत बीडच्या अविनाश साबळेने रौप्यपदक.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || Whatsapp Channel

Leave a Comment